मी ‘कंडोम’ची जाहिरात का केली ? – बिपाशा बासू

- Advertisement -

मुंबई चर्चेत आहे. तशी बिपाशा बोलायला, वागायला एकदम बिनधास्त. बॉलिवूडमध्ये एंट्री केल्यापासून ती नेहमी चित्रपटांसाठी कमी आणि इतर गोष्टींसाठी सतत प्रकाशझोतात राहिली. बिपाशाने आपल्या नवऱ्याबरोबर म्हणजेच अभिनेता करण सिंग ग्रोव्हरबरोबर एका कंडोम कंपनीची जाहिरात केली असून, इंडस्ट्रीमधून त्यांना कौतुकाचे मेसेजेस् मिळत आहेत.

बिपाशा म्हणाली, ‘आम्हाला ही जाहिरात एकत्रितपणे करावीशी वाटली. कारण, आम्हाला सुरक्षीत यौन संबंधांचा प्रसार, प्रचार करावासा वाटला. खासकरून आजच्या तरुणाईमध्ये सुरक्षीत यौन संबंधांबद्दल जागरूकता आणू शकू असे वाटले. भारतातील समाज ‘या’ विषयावर खुलून बोलत नाही. त्यामुळेच अशा प्रकारच्या जाहिरातीमुळे सामाजिक बांधिलकी जपायला मिळते. आम्हाला ही जाहिरात करताना काहीही गैर वाटले नाही. प्रसिद्ध अॅड-फिल्म मेकर प्रसाद नाईक हे ती अॅड दिग्दर्शित करणार आहेत, असे कळल्यावर तर आम्ही ताबडतोब होकार कळविला होता. कारण, त्यांची असे विषय हळुवारपणे, समजूतदारपणे हाताळण्याची आणि सुंदरतेने चित्रित करण्याची खुबी आहे.

सोशल मीडियावर बिपाशा-करण हे जोडपे एकत्र पोस्ट्स टाकताना दिसतात आणि ही जोडी सर्वात लोकप्रिय समजली जाते. त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे त्यांना बऱ्याच उत्पादनांच्या जाहिरातींसाठी विचारणा होत असते. परंतु, त्यांनी या कंडोम कंपनीच्या जाहिरातीची निवड केली. बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर यांची ती ‘कंडोम’ची जाहिरात, जाहिरात क्षेत्रात हीट ठरली आहे, असा मतप्रवाह आहे.

- Advertisement -

करियरच्या सुरुवातीला बिपाशाने अमेरिकेतील मोठ्या उत्पादन कंपनीसाठी केलेली पूर्ण-नग्न जाहिरात बऱ्याच वर्षांनंतर भारतात अपहृतपणे आल्यावर खळबळ उडाली होती. त्यामुळेच कदाचित तिने नुकत्याच केलेल्या ‘कंडोम’च्या जाहिरातीमुळे काहीच खळबळ माजली नाही.  दरम्यान, नवरात्रोत्सवात अभिनेत्री सनी लियोनी हिने केलेली कंडोमची जाहिरात देखील फार वादग्रस्त ठरली होती.

- Advertisement -