Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रकहर : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा शंभरीवर

कहर : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा शंभरीवर

101 coronavirus patients in Maharashtraमुंबई : देशभरासह राज्यातही कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. मुंबईत पुन्हा कोरोनाचे 3 नवे रुग्ण आढळले आहेत. तर सांगलीत 4 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात 24 तासांत तब्बल 23 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 101 वर पोहचली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती वाढत चालली आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये दररोज वाढ होत चालली आहे. विशेष देशात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 504 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. जगभरात 3 लाख 81 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात संचारबंदी लागू असतानाही नागरिक घराबाहेर पडत आहेत त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments