Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामहाविकास आघाडीच्या १६२ आमदारांची हॉटेल ग्रँड हयातमध्ये परेड

महाविकास आघाडीच्या १६२ आमदारांची हॉटेल ग्रँड हयातमध्ये परेड

162 mla together for the first time hotel grand hyatt at 7 pm
Image : ANI

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तापेचाचा मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात फैसला होणार आहे. या सर्व घडामोडी घडत असतांना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी टि्वट केलं. आमच्याकडे एकूण १६२ आमदारांचं संख्याबळ आहे. त्यांची आज मंगळवारी हॉटेल ग्रँड हयातमध्ये परेड करण्यात येणार आहे. राज्यपालांनी येऊन ही परेड पहावी, असं आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे केलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करून हे आवाहन केलं आहे. आमच्याकडे एकूण १६२ आमदारांचं संख्याबळ आहे. या सर्व आमदारांना हॉटेल ग्रँड हयातमध्ये ठेवण्यात आलं असून आज सायंकाळी ७ वाजता या हॉटेलातच त्यांची पहिल्यांदाच परेड करण्यात येणार आहे. राज्यपाल महोदय, हे सर्व आमदार पाहण्यासाठी तुम्ही याच, असं राऊत यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.


शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गटनेत्यांनी आज सकाळी राजभवनात जाऊन राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी त्यांनी राज्यपालांना १६२ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्रंही दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत बहुमत सादर करण्यात अपयशी ठरल्यास आमच्या आघाडीला सत्तास्थापनेसाठी बोलवण्यात यावं, अशी मागणी यावेळी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी राज्यपालांकडे केली. तसेच आमच्या आमदारांची परेड करण्याची अवश्यकता असेल तर त्यालाही आम्ही तयार आहोत, असंही त्यांनी राज्यापालांकडे स्पष्ट केलं. त्यामुळे राज्यपाल आता काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

पक्षीय बलाबल…

भाजप- १०५

शिवसेना – ५६

राष्ट्रवादी काँग्रेस- ५४

काँग्रेस- ४४

बहुजन विकास आघाडी- ३

समाजवादी पार्टी- २

एमआयएम- २

प्रहार जनशक्ती पार्टी- २

जनसुराज्य शक्ती- १

क्रांतिकारी शेतकरी पार्टी- १

महाराष्ट्र नवनिर्माण सेना- १

राष्ट्रीय समाज पक्ष- १

स्वाभिमानी पक्ष- १

शेकाप – १

माकप- १

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments