Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई‘त्या’ घोषणाप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा; पोस्टचा सखोल तपास!

‘त्या’ घोषणाप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा; पोस्टचा सखोल तपास!

Urvashi Chudawala Sharjeel Imam,Urvashi Chudawala, Sharjeel Imam,Urvashi, Chudawala, Sharjeel, Imamमुंबई : वादग्रस्त घोषणा प्रकरणी मुंबई पोलिसांनी टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्समधील (TISS) एका विद्यार्थीनीसह ५० जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वशी चुडावाला असं या विद्यार्थीनीचं नाव आहे. आरोपींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शर्जील इमामच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास ५० जणावर भारतीय दंड संहिता (IPC) कलम १२४ A, १५३ B, ३४ आणि ५०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना उर्वशी चुडावाला या विद्यार्थीनीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक स्क्रिनशॉट मिळाला आहे. यात शर्जील इमामच्या सुटकेची मागणी करणारं पोस्टर शेअर केलं आहे. शर्जील इमामच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या विद्यार्थीनीसह ५० जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

कोण आहे उर्वशी चूडावाला

यामध्ये एक नाव उर्वशी चूडावालचं देखील आहे जीच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ती टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत ती एमए (मीडिया)ची विद्यार्थिनी आहे. चुडावाला TISS Queer Collective या लैंगिक भेदभाव विरोधात काम करणाऱ्या संस्थेतदेखील सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. उर्वशी चुडावालाच्या सोशल मीडियावरील पोस्टची पोलीस सखोल तपास करत आहेत.

पोलिसांनी या प्रकरणी रॅलीचं आयोजन करणाऱ्या आयोजकांचीही चौकशी केली आहे. आयोजकांनी संबंधित गटाला ओळखत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः ही माहिती दिली.

काय आहे प्रकरण…

मुंबईतील आझाद मैदानात क्विर प्राईड मार्च (QPM) नावाने LGBTQ समुहाने शनिवार (१ फेब्रुवारी) रोजी एक रॅली आयोजित केली होती. एका गटाने शर्जील इमामच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसांनी या गटाशी संबंधित लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments