Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेश...आता २४ आठवड्यांनंतरही गर्भपात करता येणार; केंद्राचा निर्णय!

…आता २४ आठवड्यांनंतरही गर्भपात करता येणार; केंद्राचा निर्णय!

Pregnant Woman Abortion,Pregnant Woman, Abortion,Pregnant, Woman Abortion
Representational Image

नवी दिल्ली : सुधारित गर्भपात कायद्यानुसार गर्भपाताची २० आठवड्यांची मुदत २४ आठवडे केली जाणार आहे. आता २४ आठवड्यांनंतरही गर्भपात करता येणार आहे. गर्भपाताच्या मुदतवाढीला केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे.

मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अॅक्ट, १९७१ मध्ये बदल करण्यात येणार आहे. सुधारित गर्भपात कायद्यानुसार गर्भपाताची २० आठवड्यांची मुदत २४ आठवडे केली जाणार आहे. अर्थसंकल्प अधिवेशनात हे विधेयक सादर केलं जाणार आहे. सध्या भारतात कायद्यानुसार गर्भपात करण्याचा कालावधी २० आठवडे आहे. २० आठवड्यांपेक्षा जास्त गर्भ असेल तर गर्भपात करता येत नाही, गुन्हा नोंदवला जातो. गर्भपात करण्याचा कालावधी २० आठवडे असल्यामुळे ग्रामीण भागात असुरक्षित गर्भपात करण्याचे प्रमाण वाढत आहे. गरोदरपणात नंतरच्या काळात काही गुंतागुंत निर्माण झाली, तर आईचा जीव वाचवण्यासाठी काही वेळा गर्भपात करण्याची वेळ येते. पण डॉक्टरांना हा निर्णय घेण्याअगोदर कोर्टाची परवानगी घ्यावी लागते.

तर बदल होईल…

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार भारतात प्रत्येक वर्षी १७ लाख मुले व्यंगासह जन्माला येतात. जर गर्भपात कायद्यात बदल केला तर हे प्रमाण कमी होऊ शकतं असं अहवालात म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments