Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रकोंकणराष्ट्रवादीच्या ३१ वर्षीय राज्यमंत्री आदिती तटकरेंना ‘ही’ मिळाली खाती

राष्ट्रवादीच्या ३१ वर्षीय राज्यमंत्री आदिती तटकरेंना ‘ही’ मिळाली खाती

Aditi Tatkare,Aditi, Tatkare
Image: IANS

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये आज (रविवार ५ जानेवारी) रोजी खाते वाटप झालं. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वात तरुण ३१ वर्षीय महिला राज्यमंत्री आदिती सुनिल तटकरे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आदिती तटकरेंवर उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क या खात्याच्या जबाबदा-या देण्यात आल्या आहते. या विविध खात्याच्या मंत्री म्हणून कामकाज बघणार आहेत. विशेष म्हणजे प्रथमच आमदार म्हणून निवडून आल्या आणि राज्यमंत्रीपदी त्यांना काम करण्याची संधी मिळाली.

कोण आहेत आदिती तटकरे एक नजर…

आदिती तटकरे या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार सुनिल तटकरे यांच्या कन्या आहेत. आदिती यांचे एम. ए मध्ये शिक्षण झालेलं आहे. त्या २०१२ पासून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कोकण विभाग संघटक म्हणून काम करत आहेत. २३ फेब्रवारी २०१७ रोजी रोहा तालुक्यातील वरसे जिल्हा परिषद सदस्य म्हणून  विजयी झाल्या.  २१ मार्च २०१७ रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली. मार्ज २०१७ रोजी नोव्हेंबर २०१९ पर्यंत त्या अध्यक्ष होत्या. २०१९ मध्ये श्रीवर्धनमधून आमदार म्हणून विजयी झाल्या होत्या. आज त्यांच्यावर राज्यमंत्री म्हणून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री

सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, व इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमुन न दिलेले विषय/खाती

अजित अनंतराव पवार

उप मुख्यमंत्री

वित्त, नियोजन

सुभाष राजाराम देसाई

उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा

अशोक शंकरराव चव्हाण

सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून)

छगन चंद्रकांत भुजबळ

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील

कामगार, राज्य उत्पादन शुल्क

जयंत राजाराम पाटील

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास

नवाब मोहम्मद इस्लाम मलिक

अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता

अनिल वसंतराव देशमुख

गृह

विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात

महसूल

राजेंद्र भास्करराव शिंगणे

अन्न व औषध प्रशासन

राजेश अंकुशराव टोपे

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

हसन मियालाल मुश्रीफ

ग्राम विकास

डॉ.नितीन काशिनाथ राऊत

उर्जा

वर्षा एकनाथ गायकवाड

शालेय शिक्षण

डॉ.जितेंद्र सतिश आव्हाड

गृहनिर्माण

एकनाथ संभाजी शिंदे

नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

सुनिल छत्रपाल केदार

पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण

विजय वडेट्टीवार

इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन

अमित विलासराव देशमुख

वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य

उदय रविंद्र सामंत

उच्च व तंत्र शिक्षण

दादाजी दगडू भुसे

कृषि, माजी सैनिक कल्याण

संजय दुलिचंद राठोड

वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन

गुलाबराव रघुनाथ पाटील

पाणी पुरवठा व स्वच्छता

ॲड. के.सी. पाडवी

आदिवासी विकास

संदिपानराव आसाराम भुमरे

रोजगार हमी, फलोत्पादन

बाळासाहेब उर्फ श्यामराव पांडुरंग पाटील

सहकार, पणन

ॲड. अनिल दत्तात्रय परब

परिवहन, संसदीय कार्य

अस्लम रमजान अली शेख

वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास

ॲड. यशोमती ठाकूर (सोनवने)

महिला व बालविकास

शंकराराव यशवंतराव गडाख

मृद व जलसंधारण

धनंजय पंडितराव मुंडे

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

आदित्य उद्धव ठाकरे

पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार

राज्यमंत्री

अब्दुल नबी सत्तार

महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य

सतेज उर्फ बंटी डी. पाटील

गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण

शंभुराज शिवाजीराव देसाई

गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन

ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार

दत्तात्रय विठोबा भरणे

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन

डॉ. विश्वजीत पतंगराव कदम

सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा

राजेंद्र श्यामगोंडा पाटील यड्रावकर

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य

संजय बाबुराव बनसोडे

पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य

प्राजक्त प्रसादराव तनपुरे

नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन

आदिती सुनिल तटकरे

उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments