Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रपीडितेच्या कुटुंबियांनी लिखीत आश्वासनानंतर केले अंत्यसंस्कार

पीडितेच्या कुटुंबियांनी लिखीत आश्वासनानंतर केले अंत्यसंस्कार

wardha-hinganghat-burn-case-victims-death

हिंगणघाट (वर्धा) : हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा आज सोमवार (१० फेब्रुवारी) तिचा मृत्यू झाला. पीडितेच्या कुटुंबियांनी आर्थिक मदत, शासकीय नोकरी बाबत उपजिल्हाधिका-यांकडून लेखी लिहून घेतल्यानंतर पीडितेवर दरोडा गावामध्ये संध्याकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या तरुणीवर आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिलं होतं. मागील सोमवारी ही घटना घडली होती. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते. डॉक्टरांचं विशेष पथक तरुणीवर उपचार करत होतं. हिंगणघाटमधील पीडितेच्या मृत्यू झाल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला आहे. नागरिक संतप्त असून रस्त्यावर उतरुन निषेध व्यक्त करत आहेत. सोमवारी सकाळी पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संतप्त नागरिकांनी यावेळी मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका अडवली होती. तसंच काहीजणांनी दगडफेकही केली. नागरिकांकडून पोलिसांना धक्काबुक्कीही करण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ३०० पोलिसांचा फौजफाटा तैनात कऱण्यात आला आहे.

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या तरुणीवर आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिलं होतं. मागील सोमवारी ही घटना घडली होती. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते. डॉक्टरांचं विशेष पथक तरुणीवर उपचार करत होतं. मात्र, सोमवारी अचानक ह्रदयविकाराच्या धक्क्यानं तिचा मृत्यू झाला.

काय म्हणाले उपजिल्हाधिकारी….

आर्थिक मदत, शासकीय नोकरी सरकारने दिलेली आहे. त्यांच्या कुटुंबियांना मी लेखी आश्वासन दिलं आहे. सरकारकडे पाठपुरावा करु. असं उपजिल्हाधिका-यांनी सांगितलं. त्यानंतर पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments