Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रनाशिकएसटीचा टायर फुटून रिक्षाला धडकली; विहिरीत कोसळून ११ ठार!

एसटीचा टायर फुटून रिक्षाला धडकली; विहिरीत कोसळून ११ ठार!

Malegaon Bus Accident,Malegaon, Bus Accident,Malegaon Accident,Accidentकळवण : नाशिकजवळील कळवण इथं एसटी बस आणि अॅपे रिक्षाचा विचित्र अपघात झाला आहे.  बसचा टायर फुटून ती अॅपे रिक्षाला धडकली, दोन्ही वाहने थेट विहिरीत कोसळल्याची घडली आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर १९ जण जखमी झाले आहे. मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची भीती वर्तवली जात आहे.

कळवण डेपोची एसटी महामंडळाची उमराणे-देवळा बस मालेगाव येथून धोबीघाट मेशीकडे जात होती. धोबीघाटजवळील देश-विदेश हॉटेलजवळ बस पोहोचली असता अचानक टायर फुटले. त्यानंतर बस चालकाने बसवरील नियंत्रण सुटले. बसने एका अॅपे रिक्षाला धडक दिली आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या परिसरात वळली. त्यावेळी बस थेट विहिरीच्या कठड्याला धडकली. मात्र, बसचा वेग जास्त असल्यामुळे कठडा तोडून अख्खी बस विहिरीत कोसळली.

Malegaon Accident,Malegaon, Accident,Malegaon Bus Accident,Bus Accident

ही धडक इतकी भीषण होती की, अपघातानंतर बस रिक्षासह विहिरीत कोसळली. बसमधील ११ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १९ जण जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. बचाव कार्य सुरू आहे. बसची मागील काच फोडून प्रवाशांना बाहेर काढलं जात आहे. मात्र मृतकांमध्ये आकडा वाढण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments