Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईस्वातंत्र्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकार सर्वात भ्रष्ट : अनिल गोटे

स्वातंत्र्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकार सर्वात भ्रष्ट : अनिल गोटे

Devendra Fadnavis Anil Gote,Devendra, Fadnavis, Anil, Goteमुंबई : स्वातंत्र्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याइतकं भ्रष्ट सरकार यापुर्वी कधीच सत्तेत आलं नव्हतं. पाच वर्षांत फडणवीस सरकारने महाराष्ट्र ओरबाडून काढला असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केला.

देवेंद्र फडणवीस यांनी हजारो कोटींचे घोटाळे केल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. मी अतिशय जबाबदारीने वक्तव्य केलं आहे. मी याचे पुरावे देऊ शकतो. मी पुराव्याशिवाय, कागदपत्राशिवाय कधीच बोलत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी हजारो कोटींचे घोटाळे केले. शिवस्मारकाच्या कामात इतका घोळ केला आहे की, उभ्या महाराष्ट्राने पायताणाने मारलं पाहिजे. शिवाजी महाराजांनाही सोडलं नाही,” असं अनिल गोटे यांनी म्हटलं आहे.

मोपलवार यांच्याइतका भ्रष्ट माणूस जर देवेंद्र फडणवीस यांना चालत असेल तर काय बोलायचं ?काही सांगायची गरजच नाही. प्रत्येक गावात काय घोटाळा केला आहे याची यादी माझ्याकडे आहे,” असं सांगताना अनिल गोटे यांनी समृद्धी महामार्गातही घोटाळा झाला असल्याचा आरोप केला.

लोकांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा विश्वास उडाला आहे असं सांगताना फडणवीस यांच्या खोटारडेपणाला कंटाळून मी राजीनामा दिला असल्याचं अनिल गोटे यांनी सांगितलं. आपल्या पक्ष सोडण्याचं कारण सांगताना अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस दिलेला शब्द पाळत नाहीत असा आरोप केला.

“मी त्यांच्यावर मनापासून प्रेम केलं. पण ते सगळ्या गुंड, बदमाशांचे साथीदार आहेत हे लक्षात आलं. पक्ष सामान्य माणसांचा असतो. आता सगळी राजघराणी आमच्या पक्षात आली असं ते म्हणाले होते. राजघराण्यांसाठी पक्ष चालवता का ? शेवटचा गरीब माणूस आपल्या पक्षात राहील असं मी म्हटलं असतं. पण यांना राजघराण्याची पडली आहे,” अशी टीका अनिल गोटे यांनी केली आहे.

धुळे शहरातील भाजपाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी डिसेंबर महिन्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. महानगरपालिका निवडणुकीपासून गोटे यांनी पक्षात राहून भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. राष्ट्रवादीत आल्यानंतरही अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीका सुरु ठेवली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments