Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशपंतप्रधान मोदींच्या ट्वीटनंतर #Nosir, टोले आणि सल्ले!

पंतप्रधान मोदींच्या ट्वीटनंतर #Nosir, टोले आणि सल्ले!

Narendra Modi quits Social Media,Narendra Modi, quits Social Media,Narendra, Modi, Social, Media,Narendra Modi Social Media,Narendra Modi on Social Media,Narendra Modi quits Twitter,Narendra Modi quits Facebook,Narendra Modi quits Instagram

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मी सोशल मीडिया सोडू इच्छितो, अशा प्रकारचे ट्विट सोमवारी रात्री केले. त्यानंतर सोशल मीडियावर मोठी खळबळ माजली आहे. पंतप्रधानांच्या ट्विटनंतर थोड्याच वेळात ‘नो सर’ ट्रेन्ड करायला लागलं. तर काहींनी खोचक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. मंगळवारी सकाळीही हा टॉप ट्रेन्ड होता.#Nosir  हा हॅशटॅग वापरून चाहते पंतप्रधानांना सोशल मीडियातून बाहेर न पडण्याची विनंती करत आहेत. ‘अनेक त्रुटी असल्या तरी हे शक्तीशाली माध्यम आहे’ असं पंतप्रधानांचे चाहते त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत.

येत्या रविवारी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब सारखे सोशल मीडियावरचे अकाऊटंस बंद करण्याचा विचार करतोय, असं मोदी यांनी ट्वीट केलं आहे. लवकरच तुम्हाला यासंदर्भात कळवेन असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदींच्या या ट्वीटनंतर अनेक दिग्गजांसह सामान्य माणसांनीही यावर आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. अनेकांनी मोदींना सोशल मीडिया सोडू नका, अशी विनंतीही केली आहे. तर राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यासमवेत अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी मोदींवर टिका करण्यास सुरुवात केली आहे.

मोदीजी व्देष सोडा, सोशल मीडिया नको – राहुल गांधी

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी ट्वीट केलं आहे. पंतप्रधान मोदीजी द्वेष सोडा, सोशल मीडिया नको, असा सल्ला राहुल गांधी यांनी मोदी यांना दिला आहे. पंतप्रधान मोदींच्या मनात द्वेष आहे, अशी टीका अनेक वेळा राहुल गांधी यांनी केली आहे.

लाखो फॉलोअर्स अनाथ होतील – संजय राऊत

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया सोडलं तर त्यांचे लाखो फॉलोअर्स अनाथ होतील, त्यांना अनाथ करणं ठिक नाही. हे त्यांचे सायबर योद्धा आहेत, योद्धा सेनापतीच्या आदेशानुसार काम करतात. सेनापतीच सोशल मीडियाचं मैदान सोडणार असतील तर फौज काय करेल?अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

पंतप्रधानांनी म्हणून आठ दिवसांचा वेळ घेतला असले – डॉ. जितेंद्र आव्हाड

सोशल मीडिया बंद करायला आठ दिवसांचा वेळ घेतलाय पण नोटबंदी मात्र क्षणातच केली होती. म्हणजे विचार न करता घेतलेले निर्णय किती घातक असतात याची कल्पना आल्यामुळे त्यांनी आठ दिवसांचा वेळ घेतला असले का?

सोडण्यासाठी अनेक गोष्टी आहेत – अखिलेश यादव

अखिलेश यादव यांनी ट्वीट केलं आहे की, ‘सामाजिक संवादाचे रस्ते बंद करण्याचा विचार करणं योग्य गोष्ट नाही. सोडण्यासाठी अनेक गोष्टी आहेत साहेब. जसा सत्तेचा मोह, विद्वेषाच्या राजनितीचा विचार, मन-मर्जी करण्याच्या गोष्टी, निवडक मीडियाशी विचारलेले तुमच्या आवडीचे प्रश्न आणि विश्व विहार. कृपया या गोष्टींवर विचार करा.’

ट्रोलर्सच्या फौजेला हा सल्ला द्या –  रणदीप सुरजेवाला

काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला म्हणाले की, ‘सन्माननिय पंप्रधानजी, तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही त्या ट्रोलर्सच्या फौजेला हा सल्ला द्या की, जे तुमच्या नावाने दर सेकंदाला अपशब्दांचा वापर करत धमक्या देतात.’

विचार करतोय की, सोमवारी काय कराव – तेजस्वी यादव

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनीही ट्वीट केलं आहे की, ‘विचार करतोय की, सोमवारी काय कराव?’

जीडीपी लगी गिरने तो टीआरपी स्टंट लगे बढ़ने – कन्हैया कुमार

जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीच्या विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष आणि सीपीआय नेते कन्हैया कुमार यांनीही ट्वीट करत मोदींवर निशाणा साधला आहे. तो म्हणाला की, ‘जीडीपी लगी गिरने तो टीआरपी स्टंट लगे बढ़ने!!’

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील दुसरे राजकीय नेते…

समाज माध्यामाच्या जगातून कायमचा रामराम ठोकण्याच्या विचारात असल्याचे या ट्वीटवरून दिसत आहे. ट्वीटरवर सर्वाधिक फॉलो करणाऱ्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील दुसरे राजकीय नेते आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब ही सोशल मीडिया अकाउंट येत्या रविवारपासून बंद करण्याचा माझा विचार आहे, असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलंय. यामुळे सर्वत्र वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मोदींचे ट्विटरवर ५३.३ मिलिअन फॉलोअर्स आहेत. फेसबुकवर ४४, ५९७, ३१७ जण त्यांना फॉलो करतात. तर इन्स्टाग्रामवर त्यांचे ३५.२ मिलिअन फॉलोअर्स आहेत. युट्यूबवर साडेचार मिलीयन सबस्क्रायबर आहेत.

पंतप्रधानांना सोशल मीडिया न सोडण्याचा सल्ला…

पंतप्रधान ज्यांना फॉलो करतात अशांनीही #Nosir हॅशटॅग वापरत पंतप्रधानांना सोशल मीडिया न सोडण्याचा सल्ला दिलाय. आत्तापर्यंत ७० हजारांहून अधिक जणांनी पंतप्रधानांच्या या ट्विटवर रिप्लाय केलाय. तर ३० हजारांहून अधिक जणांनी पंतप्रधानांचं ट्विट रिट्विट केलंय.

सोशल मीडियावर एवढे आहेत फॉलोअर्स…

फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब ही सोशल मीडिया अकाउंट येत्या रविवारपासून बंद करण्याचा माझा विचार आहे, असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलंय. यामुळे सर्वत्र वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मोदींचे ट्विटरवर ५३.३ मिलिअन फॉलोअर्स आहेत. फेसबुकवर ४४, ५९७, ३१७ जण त्यांना फॉलो करतात. तर इन्स्टाग्रामवर त्यांचे ३५.२ मिलिअन फॉलोअर्स आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments