पाच दिवस बंद राहणार बँका; तातडीने उरकून घ्या महत्त्वाची कामं

- Advertisement -
banks-will-be-closed-for-five-days-due-to-bank-strike-and-bank-holidays-check-dates-
banks-will-be-closed-for-five-days-due-to-bank-strike-and-bank-holidays-check-dates-

मुंबई: बँकेशी संबंधित काही महत्त्वाची कामे असतील तर लवकरात लवकर उरकून घ्या. कारण परवाचा शुक्रवार (दि.१२) वगळता बँका पाच दिवसांसाठी बंद असणार आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात बँकेची कामे करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

उद्या गुरूवारी (दि.११) महाशिवरात्रीनिमित्त राज्यातील बँकांना सुट्टी आहे. त्यानंतर शुक्रवारी (दि.१२) बँका सुरू राहतील, पण नंतर १३ तारखेला दुसरा शनिवार आणि १४ तारखेला रविवार असल्याने बँका पुन्हा बंद असतील.

तर, त्यानंतर १५ आणि १६ तारखेला म्हणजे सोमवार आणि मंगळवारीही बँका बंद असतील. कारण, बँकांच्या खासगीकरणाला विरोध करत बँक कर्मचारी संघटनेने संपाची घोषणा केली आहे. संपामुळे दोन दिवस बँकातील कामकाज बंद असेल. त्यानंतर १७ तारखेला बँका पुन्हा सुरू होतील.

- Advertisement -

त्यामुळे जर बँकेची काही महत्वाची कामे असतील तर ती 11 मार्चआधीच संपवा, नाहीतर ११ मार्च ते १६ मार्च अशा सहा दिवसांमध्ये केवळ एकच दिवस कामकाज सुरु असल्याने बँकांमध्ये प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -