Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याराष्ट्रवादीतून भाजपात गेलेले आमदार पुन्हा स्वगृही परतणार : जयंत पाटील

राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले आमदार पुन्हा स्वगृही परतणार : जयंत पाटील

jayant patil ncp
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेलेले व काही अपक्ष आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. त्या आमदरांना पुन्हा प्रवेश द्याचा की नाही हे त्या त्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यांनतर आम्ही निर्णय घेऊ असेही पाटील यांनी सांगितले.

आज पुण्यात राष्ट्रवादीची कोअर कमिटीची बैठक होती. बैठक सुरु होण्याआधी पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी हा दावा केला. जयंत पाटील म्हणाले, १५ ते २० आमदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र, त्यांची नावं आत्ताच मी उघड करणार नाही कारण त्यांच्यासाठी ते अडचणीचं होईल. आम्ही मेगा भरती करणार नाही तर मेरिट भरती करु असेही पाटील यावेळी म्हणाले. या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे हे अद्याप शरद पवारांनी स्पष्ट केलेले नाही. मात्र, कोणाला पाठींबा द्यायचा यापेक्षा सरकार कोणाचं होईल याबाबत चर्चा होईल असं वाटतं. किमान समान कार्यक्रमाचा मसुदाही अद्याप अंतिम झालेला नाही, असे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

भाजपासोबत जाणार का? या प्रश्नावर बोलताना भाजपाची विचारधारा वेगळी असल्याने त्यांच्यासोबत जाणार नाही, असे पाटील म्हणाले. मग शिवसेनेसोबत कसं जाणार? या प्रश्नावर दगडापेक्षा वीट मऊ असे उत्तर त्यांनी दिले. त्याचबरोबर जनतेच्या मनातील सरकार आम्ही देणार पण स्थिर सरकार देण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. थोडासा उशीर झाला तरी चालेल पण राज्यात एक मजबूत आणि पाच वर्षे टिकणारं सरकार आलं पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचे ते यावेळी म्हणाले. मात्र, त्या आमदारांना पुन्हा राष्ट्रवादी प्रवेश दिला जाणार असल्यामुळे भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments