Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईखळबळजनक : भाजपाकडून खडसेंचाही फोन टॅप!

खळबळजनक : भाजपाकडून खडसेंचाही फोन टॅप!

eknath khadse criticizes bjp devendra fadnavis after exiting powerमुंबई : तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात विरोधकांप्रमाणे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांचाही फोन टॅप करण्यात आला. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे चौकशीनंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

फोन टॅपिंगच्या चौकशीसाठी गृहविभागाने गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत सिंह आणि गुप्तचर विभागाचे पोलिस सहआयुक्त अमितेश कुमार यांची दोन सदस्यीय समिती नेमली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे मागील वर्षभर फोन टॅप करून राजकीय फायदा मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणांचा गैरवापर झाल्याचा आरोप होता. आता भाजपचे नेते एकनाथ खडसे यांचाही फोन टॅप केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री असताना एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यानंतर त्यांना मंत्रिपद सोडावे लागले होते.

विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ खडसे हे भाजपविरोधात भूमिका घेणार असल्याची चर्चा होती. आता, त्यांचाही फोन टॅप केला असल्याची माहिती समोर येत आहे. चौकशी आयोगाच्यावतीने एकनाथ खडसे यांच्या फोन टॅपिंगची चौकशी करण्यात येणार आहे. फोन टॅपिंग प्रकरणी नेमण्यात आलेली चौकशी समिती सहा आठवड्यात गृह खात्याला आपला अहवाल सोपवणार आहे.

फोन टॅपिंगची चौकशी जाहीर केल्यामुळे काही पोलिस अधिकाऱ्यांमध्येही भितीचे वातावरण आहे. अधिकारी हे सरकारच्याच आदेशानुसार काम करतात. या प्रकरणात एक ज्येष्ठ अधिकारी गुंतला असण्याची शक्यता एका ज्येष्ठ मंत्र्याने वर्तवली. इस्रायलला जाऊन काय प्रशिक्षण घेतले, तेही समजणे गरजेचे आहे. याचे धागे-दोरे दिल्लीपर्यंत आहेत. त्यामुळे सर्व अहवाल समोर आल्यानंतर दूध का दूध पाणीँ का पाणी होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments