Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपचं वर्तन करोना व्हायरसपेक्षाही डेंजर; अशोक चव्हाणांचे टीकास्त्र!

भाजपचं वर्तन करोना व्हायरसपेक्षाही डेंजर; अशोक चव्हाणांचे टीकास्त्र!

ashok chavan on bjpमुंबई : भाजपने मध्यप्रदेशात सुरू केलेल्या ऑपरेशन लोट्सवर काँग्रेस नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी टीकास्त्र सोडलं आहे. सत्तेसाठी भाजपने सुरू केलेल्या या प्रकाराला ऑपरेशन लोट्स नव्हे तर करोना व्हायरसच म्हटलं पाहिजे. भाजपचं वर्तन हे करोना व्हायरसपेक्षाही डेंजर असून त्याची दक्षता घेतलीच पाहिजे, अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.

अशोक चव्हाणांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ऑपरेशन लोट्सवर सडकून टीका केली. भाजपचं ऑपरेशन लोट्स हा नित्याचाच भाग आहे. त्याची आम्हाला सवय झाली असून लोकशाहीला मानणारे राजकीय पक्ष ऑपरेशन लोट्सला कधीही भीक घालणार नाही. देशात लोकशाही आहे आणि लोकशाही मार्गानेच सरकारे चालली पाहिजेत. मग कोणतीही सरकारे असोत. ज्या राज्यात त्यांचं सरकार नाही. तिथले आमदार फोडण्याचा भाजपचा प्रयत्न असतो. भापजपंच हे वर्तन करोना व्हायरसपेक्षाही कठीण आहे. त्याची दक्षता घेतलीच पाहिजे, असं सांगतानाच त्यावर अँटिबायोटिक शोधण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे, असा टोलाही अशोक चव्हाण यांनी लगावला.

कमलनाथ हे सक्षम मुख्यमंत्री

कमलनाथ हे सक्षम मुख्यमंत्री आहेत. मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकारला कोणताही धोका नाही, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, मध्यप्रदेशातील काँग्रेसचे आठ आमदार दिल्लीत पोहोचल्याने कमलनाथ सरकार कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत असून त्यानिमित्ताने ऑपरेशन लोट्सची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर अशोक चव्हाणांनी जोरदार टीका केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments