Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपचे महाराष्ट्रातील स्टार प्रचारक दिल्लीत फेल

भाजपचे महाराष्ट्रातील स्टार प्रचारक दिल्लीत फेल

Vinod Tawde Delhi Results,Vinod Tawde, Delhi Results,Vinod, Tawde, Delhi, Results,Delhi Exit Polls, Delhi Assembly Elections,Delhi Elections

मुंबई : दिल्ली विधानसभा काबीज करण्यासाठी दिल्ली भाजपने महाराष्ट्र भाजपची मदत घेतली होती. महाराष्ट्रातील १० भाजप नेत्यांनी दिल्ली विधानसभेतील २५ मतदारंसघासाठी प्रचार केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासहस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील इतर नेत्यांची टीम प्रचारासाठी दिल्लीत गेली होती. मात्र, त्या मतदारसंघात भाजपचा पराभव झाला.

Raosaheb Danve Delhi Results,Raosaheb Danve, Delhi Results,Raosaheb, Danve, Delhi, Results,Delhi Exit polls,Delhi Assembly Elections,Elections,Delhi Elections

माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, खासदार रक्षा खडसे, हिना गावित, पूनम महाजन, भारती पवार, आमदार आशिष शेलार या नेत्यांच्या सभा दिल्लीत आयोजित करण्यात आल्या होत्या. या नेत्यांना तसा प्रतिसाद मिळाला नाही. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील नेते दिल्लीत पांपलेट वाटप करतांना दिसले होते. सोशल मीडियावर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर जोरदार टीका करण्यात आली होती. भाजपचे नेते हे महाराष्ट्रात दिवे लावू शकले नाहीत. ते दिल्लीत काय करणार अशी चर्चा रंगली होती.

Devendra Fadnavis Delhi Results,Devendra Fadnavis, Delhi Results,Devendra, Fadnavis, Delhi, Results,Delhi Assembly Elections,Delhi Elections,Exit Polls

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ८ फेब्रुवारीला मतदान झाल्यानंतर आज मंगळवार ११ फेब्रुवारीला निकाल जाहीर होत आहेत. ७० पैकी आपला ५८ जागांवर आघाडी घेतली. तर भाजपने १२ जागांवर आघाडी घेतली. ७० पैकी २५ मतदारसंघात महाराष्ट्रातील १० स्टार प्रचारक नेत्यांनी प्रचार केला. यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, खासदार रक्षा खडसे, हीना गावित, पूनम महाजन, भारती पवार, आमदार आशिष शेलार या नेत्यांच्या सभा दिल्लीत आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याचा काहीही उपयोग भाजपला झाला नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments