Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशजेएनयू भ्याड हल्लाप्रकरणी बॉलीवूड संतप्त; असा केला राग व्यक्त...

जेएनयू भ्याड हल्लाप्रकरणी बॉलीवूड संतप्त; असा केला राग व्यक्त…

JNU Violenceमुंबई : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. या घटनेमुळे बॉलीवुड सेलेब्सने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि आपला राग व्यक्त केला आहे. ट्विंकल खन्नापासून ते तापसी पन्नू, स्वरा भास्कर, शबाना आजमी, अनुराग कश्यप, नेहा धूपिया, रितेश देशमुखसह अनेक सेलिब्रिटींनी ट्विटरवर आपला राग व्यक्त केला.

असा केला राग व्यक्त….

ट्विंकल खन्नाने लिहिले, “भारत, जिथे गायींना विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सुरक्षा मिळते. हा तो देश आहे, ज्याने घाबरून जगण्याला नकार दिला आहे. तुम्ही हिंसाचार करून लोकांचा आवाज दाबू शकत नाही….आणखी जास्त विरोध होईल, प्रदर्शन जास्त होईल, रस्त्यावर जास्त लोक उतरतील.’

स्वरा भास्करची आई जेएनयूमध्ये प्रोफेसर आहे. तिने आईचा मॅसेज शेअर करून लिहिले, ‘माझ्या आईकडून, SMS द्वारे, नॉर्थ गेटच्या बाहेर गर्दी घॊशन देत आहे की, ‘देशाच्या गद्दरांना गोळी मारा सर्वांना.’ एवढेच नाही, स्वराने राहुल गांधीच्या ट्वीटवर देखील रिप्लाय करून त्याला जेएनयूमध्ये जाण्याचे अपील केले होते, जेणेकरून त्याच्या प्रेशरमुळे तेथील परिस्थिती सुधारू शकेल. स्वरा भास्करने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही अपील केली आहे.

रेणुका शहाणेने लिहिले, “पूर्णपणे कायद्याच्या विरुद्ध, चेहरा झाकलेले गुंड जेएनयू (JNU) मध्ये कसे शिरू शकतात आणि शिक्षकांना कसे घाबरवू शकतात. दिल्ली पोलिस काय करत आहे, केवळ निशस्त्र लोकांवर वर ककर्ता येतात का ? जे सरळसरळ कायद्याचे उल्लंघन करत आहेत त्यांना मुक्त सोडले आहे का ? अविश्वसनीय, भयंकर, लाजिरवाणे”.

शबाना आजमीने लिहिले, “खरच असे होत आहे ? मी भारतात नाहीये आणि हे सर्व एखाद्या वाईट स्वप्नसारखे वाटत आहे. जेएनयूमध्ये हिंसाचार भडकल्यामुळे २० विद्यार्थ्यांना एम्समध्ये दाखल केले गेले.”

अनुराग कश्यपने लिहिले, “आपण आता केवळ गप्प बसून हे पाहू शकत नाही.’ आणखी एका ट्वीटमध्ये त्याने लिहिले, ‘हिंदुत्व दहशतवाद आता पूर्णपणे वाढला झाला आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments