Placeholder canvas
Friday, April 26, 2024
HomeदेशCAA : जामियाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

CAA : जामियाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

Jamia Millia Protest,Jamia Millia, Protest,Jamia, Millia, Protest,नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) च्या विरोधातील आंदोलनं सुरूचं आहेत. जामिया समन्वय समितीने जामिया ते संसद असा निषेध मोर्चा काढला. या आंदोलनादरम्यान देशद्रोहाच्या आरोपात अटक असलेल्या शरजील इमाम यांच्या समर्थनार्थ काही बॅनरही दाखवण्यात आले. शरजील इमाम यांची मीडिया ट्रायल व्हायला नको अशी मागणी यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी केली आहे. जर शरजीलवर आरोप सिद्ध झाले तरच त्याच्यावर कारवाई व्हावी अशी या विद्यार्थ्यांची भूमिका आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीजार्च केला.

दरम्यान विद्यार्थ्यांच्या या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मोर्चा मार्गावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या अगोदरही जामिया सनन्वय समितीने संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. नागरिकत्व सुधारणा कायदा, NRC आणि NPR लागू करण्याला जामिया समन्वय समितीचा तीव्र विरोध आहे. त्यांच्या वतीनेच हा मोर्चा काढण्यात आला होता. शरजील इमामविरोधी माध्यमांमधून नकारात्मक मजकूर प्रसिद्ध होत आहे. माध्यमांनी त्याला देशद्रोही ठरवून टाकलं आहे. अशा प्रकारे माध्यमांनीच न्याय न देता, त्याच्यावरचा गुन्हा प्रत्यक्षात सिद्ध झाल्यावरच त्याविषयी लिहावं. अशी मागणी यावेळी केली. यावेळी पोलिसांनी आंदोलन करणा-या विदयार्थ्यांना रोखले. त्यावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments