Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
HomeदेशCAA : विद्यार्थी नेता शर्जील इमामला अटक

CAA : विद्यार्थी नेता शर्जील इमामला अटक

Sharjeel Imam,Sharjeel, Imamपाटणा : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी नेता शर्जील इमामला बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. शर्जील विरोधात देशद्रोह आणि धार्मिक तेढ वाढवण्यासह गंभीर आरोप करत अनेक राज्यांमध्ये देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

सहा राज्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते…

शर्जीलविरुद्ध दिल्लीसह बिहार, आसाम, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मणिपूर अशा एकूण सहा राज्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली पोलिसांची पाच पथके त्याच्या मागावर होती. दिल्लीसह पाटणा व मुंबईतही काही ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. मात्र शर्जील हाती लागला नव्हता. आज त्याला जहानाबादमधील काको येथून अटक करण्यात आली आहे. शर्जीलच्या वकिलांनी मात्र शर्जील स्वत:हून पोलिसांपुढे हजर झाला व त्याला नंतर अटक करण्यात आली, असा दावा केला आहे.

शाहीन बागेत आयोजित करण्यात करण्यात आलेल्या निदर्शनांमागे शर्जील होता. तेथे त्याने दोन धर्मांत तेढ वाढवणारे प्रक्षोभक भाषण केले, असा आरोप ठेवून त्याच्यावर विविध कलमांखाली रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये १६ जानेवारी रोजी केलेल्या भाषणावरूनही शर्जील गोत्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध या भाषणामुळे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसाम पोलिसांनीही त्याच्याविरुद्ध दहशतवाद विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. शर्जील हा जेएनयूत पीएचडी करत असून विद्यापीठ प्रशासनानेही त्याच्याविरुद्ध कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत. जेएनयूच्या शिस्तपालन अधिकाऱ्यांमार्फत शर्जीलला समन्स बजावण्यात आले आहे. शिस्तपालन समितीपुढे ३ फेब्रुवारीच्या आत हजर राहावे व प्रक्षोभक भाषणांबाबत स्पष्टीकरण द्यावे, असे या समन्समध्ये नमूद करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments