मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज किल्ले शिवनेरीवर

- Advertisement -

Chief Minister Uddhav Thackeray today at Fort Shivneriमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज गुरुवारी शिवनेरी किल्ल्यावर आणि एकवीरा देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. त्यानंतर जाहीर कार्यक्रमात भाजपवर काय हल्लाबोल करता याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

शिवनेरी हे शिवरायांचे जन्मस्थळ आहे. एकवीरा देवाचे दर्शन घेतल्यानंतर उध्दव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर ठाकरे हे शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचे आर्शीवाद घेण्यासाठी जाणार आहेत. ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान राज्यातील सत्तास्थापनेनंतर शिवनेरीला जाणार असल्याचे म्हटले होते. सत्तास्थापनेच्या घडामोडींदरम्यान, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यावर मी स्वत: शिवनेरीवर जाणार, तसेच, कुलदैवत एकवीरेचेही दर्शन घेईन, असेही ठाकरे म्हणाले होते. त्यानुसार ते हा दौरा करीत आहेत.

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here