औरंगाबादेत भरधाव कारची रिक्षाला धडक; चार ठार

- Advertisement -

Aurangabad Jalna Accident,Aurangabad, Jalna, Accidentऔरंगाबाद : औरंगाबाद-जालना मार्गावर भरधाव कारने एका ऑटोरिक्षाला जोरदार धडक दिली. यामध्ये चारजण जागीच ठार झाले. या अपघातामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. हा अपघात औरंगाबाद-जालना मार्गावर हा अपघात आज (बुधवार) सकाळी ९. ४५ च्या सुमारास शेकटा गावाजवळ झाला.

या विषयी अधिक माहिती अशी की, आज (बुधवार) सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास जालना येथून निघालेला अपेरिक्षा औरंगाबाद दिशेकडे शेकटा शिवारातील अमृतसर पेट्रोलपंप समोरून जात होता. त्याच वेळी औरंगाबाद दिशेने भरधाव वेगाने येणारी कारदुभाजकावरून विरुद्ध दिशेला येऊन रिक्षावर वेगाने धडकली. या अपघातात रिक्षातील सर्व प्रवाशी चिरडले. या अपघातात चार जण जागीच ठार झाले. तर यात एक जण जखमी झाला. ही माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यामुळे एकच खळबळ उडाली. गंभीर जखमीला औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here