Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशझारखंडमध्ये भाजपचे पानिपत; काँग्रेस-जेएमएमयूचा वरचष्मा!

झारखंडमध्ये भाजपचे पानिपत; काँग्रेस-जेएमएमयूचा वरचष्मा!

Jharkhand Hemant Soren,Jharkhand,Assembly,Elections,Hemant Sorenरांची : राम मंदिराच्या निकालानंतर झारखंड मध्ये विधानसभेची पहिली निवडणूक होती. मात्र, झारखंडच्या मतदारांनी भाजपला झारखंडमधून हद्दपार केले. महाराष्ट्रानंतर भाजपने झारखंडही गमावला आहे. झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव यांच्या राजदने भाजपवर मात करत झारखंड विधानसभा निवडणुकीत बहुमताचा आकडा पार केला आहे. सध्या मतमोजणी सुरु असून स्पष्ट निकाल हाती आले नाही.

झारखंडमध्ये बहुमतासाठी ४१ जागांची आवश्यकता आहे. पण जेएमएम आघाडीने सुरुवातीच्या कलांमध्ये ४३ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप आणि मित्रपक्ष सध्या २९ ठिकाणी आघाडीवर आहे. तर एमआयएमचा सुपडा येथे साफ झाला आहे. भाजपने झारखंडमध्ये सत्ता गमावले असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली. यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. पण शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्याने भाजपला सत्तेपासून दूर रहावं लागलं. झारखंडमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष तर ठरला आहे. पण जेएमएमला काँग्रेसचीही साथ आहे. त्यामुळे भाजपसाठी बहुमताचा आकडा गाठणं सध्या तरी कठीण दिसत आहे.

२४ ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभेचा निकाल जाहीर झाला होता. यानंतर अनेक दिवस चाललेल्या राजकीय अस्थिरतेनंतर अखेर महाराष्ट्र विकास आघाडीने सरकार स्थापन केलं आणि भाजपला सत्तेपासून दूर रहावं लागलं.

कार्यकर्त्यांचा जल्लोष….

काँग्रेस – जेएमएमच्या कार्यकर्त्यांनी रांचीत जोरदार सेलिब्रेशन सुरू केलं आहे. तर दुसरीकडे भाजपच्या गोटात शांतता आहे. भाजपला अजूनही अंतिम निकालाची प्रतिक्षा आहे. तर काँग्रेसने मात्र भाजपचा पराभव झाला असल्याचं म्हटलं आहे.

भाजपने हे पाच राज्य गमावले…

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने छत्तीसगड, मध्ये प्रदेश आणि राजस्थान ही तीन महत्त्वाची राज्य गमावली होती. यानंतर लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. पण या निवडणुकीनंतर लगेचच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही पराभवाचा सामना करावा लागला.  हरियाणा विधानसभा निवडणुकीतही मित्रपक्षाची मदत घ्यावी लागली आहे. आता झारखंडही भाजपच्या हातातून हे जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments