Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशकाँग्रेस बंडखोर आमदारांविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शनं

काँग्रेस बंडखोर आमदारांविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शनं

Congress protestबंगळुरु : मध्यप्रदेशच्या बंडखोर १९ काँग्रेस आमदारांविरोधात बंगळुरुमध्ये पाम रिसॉर्टसमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थक १९ काँग्रेस आमदारांनीही आमदारकीचा राजीनामा दिला. मध्यप्रदेशचे सर्व बंडखोर आमदार बंगळुरुच्या पाम रिसॉर्टमध्ये मुक्कामासाठी थांबलेले आहेत. ही माहिती मिळताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या बंडखोर आमदारांविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी मोठा गोंधळ उडाला होता.

हे आमदार सध्या बंगळुरूत

बंगळुरूमध्ये थांबलेल्या सिंधिया समर्थक आमदारांना बुधवारी बंगळुरूतून दुसरीकडे हलवले जाणार आहे. यामध्ये आमदार प्रदुम्न सिंह तोमर, रघुराज कंसाना, कमलेश जाटव, रक्षा सरोनिया, जजपाल सिंह जज्जी, इमरती देवी, प्रभुराम चौधरी, तुलसी सिलावट, सुरेश धाकड, महेंद्र सिंह सिसोदिया, ओपीएस भदौरिया, रणवीर जाटव, गिर्राज दंडोतिया, यशवंत जाटव, गोविंद सिंह राजपूत, हरदीप डंग, मुन्ना लाल गोयल तसेच ब्रिजेंद्र यादव यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments