Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेक्वारंटाईनमधून 14 जण बेपत्ता

क्वारंटाईनमधून 14 जण बेपत्ता

corona virus quarantine people missing from puneपुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणत वाढला आहे सरकारने हे रोखण्यासाठी हालचाली केल्या आहेत. नागरिकांना १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र अनेक ठिकाणी या नियमांचं उल्लंघन केलं जातं आहे. पुण्यात परदेशातून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईनमध्ये राहण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र त्यातले काही जण अचानक बेपत्ता झाले आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

पुणे पोलिसांनी या सगळ्यांना हजर राहण्याचं आवाहन केलं आहे. जर बेपत्ता झालेले हे लोक हजर झाले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असंही पोलिसांनी म्हटलं आहे. याबाबत पुणे पोलिसांनी पुणेकरांनाही आवाहन केलं आहे. क्वारंटाईनचा शिक्का असलेली व्यक्ती दिसली तर आम्हाला 18002334130 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा असंही आवाहन पोलिसांनी केलं आहे. बेपत्ता झालेले लोक हे त्यांच्या गावी किंवा दुसरीकडे वास्तव्यास गेल्याची शक्यता व्यक्त होते आहे. दोन दिवसांपासून कोरोना ग्रस्तांची संख्या वाढते आहे. त्यामुळे काळजी घ्या असंही आवाहन करण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments