Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याराम मंदिराचा मार्ग मोकळा, न्यायालयाने १८ फेरविचार याचिका फेटाळल्या

राम मंदिराचा मार्ग मोकळा, न्यायालयाने १८ फेरविचार याचिका फेटाळल्या

Court rejects 18 petition on Ram temple caseनवी दिल्ली : अयोध्या येथील जमीन वादाच्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या सर्व १८ फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे राम मंदिर बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुख्य न्यायमूर्ती एस.ए.बोबडे, न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड, अशोक भूषण, ए अब्दुल नझीर आणि संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने या सर्व याचिका मेरीट नसल्यामुळे फेटाळून लावल्या.

सर्वोच्च न्यायालयाने नऊ नोव्हेंबरला अयोध्या जमीन वादाच्या खटल्यात निकाल दिला. या निकालाविरोधात या सर्व फेरविचार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. आज गुरुवारी त्या प्रकरणी निकाल आला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे वादग्रस्त जागेवर राममंदिराच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला तसेच अयोध्येत मशीद बांधण्यासाठी ५ एकर जागा सुन्नी वक्फ बोर्डाला देण्याचे निर्देशही न्यायालयाने केंद्र सरकारला दिले होते.

फेरविचार याचिका फेटाळून लावल्या हे आमचे दुर्देव – जाफरयाब जिलानी

सर्वोच्च न्यायालयाने आमच्या फेरविचार याचिका फेटाळून लावल्या हे आमचे दुर्देव आहे. आमचे पुढचे पाऊल काय असेल याबद्दल मी आताच काही सांगू शकत नाही. आम्ही आमचे वरिष्ठ वकिल राजीव धवन यांच्याबरोबर चर्चा करु” असे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या जाफरयाब जिलानी यांनी सांगितले.

आम्ही दु:खी आहोत – अर्शद मदनी

“सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यामुळे आम्ही दु:खी आहोत. बाबरी मशीद पाडली आणि ज्यांनी हे कृत केले ते गुन्हेगार असल्याचे कोर्टाने मान्य केले. पण न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला” अशी भावना जमीयत उलेमा-ए-हिंदचे अर्शद मदनी यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments