Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeकोंकणपालघरपालघर : तारापूर कारखाना स्फोटातील मृतकांचा आकडा वाढला

पालघर : तारापूर कारखाना स्फोटातील मृतकांचा आकडा वाढला

ढिगा-याखाली अडकलेल्या कामगारांचा शोध सुरु

Palghar Tarapur Fire,Palghar, Tarapur, Fire,Palghar Fire,Tarapur Fire,Maharashtra,Boisar Fire,Maharashtra Fire,Gujrat Fire,Vadodara Fire,Chemical Factory Fire,Chemical Factory,Chemical, Factory
Image: IANS

पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील ए. एन. के. फार्मा रासायनिक कंपनीत शनिवारी संध्याकाळी ७ वाजता भीषण स्फोट झाला. या स्फोटाने परिसर अक्षरश: हादरला. या स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाला. आज रविवारी एक मृतदेह सापडला. तर १० कर्मचारी जखमी झाले. एनडीआरएफ च्या पथकाकडून शोध मोहीम सुरु आहे. अजूनही एक मुलगी बेपत्ता आहे. बेपत्ता कामगारांचा सध्या शोध सुरुचं असून, मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

तारापूर औद्योगिक वसाहतीत ए. एन. के. फार्मा ही कंपनी नव्यानेच सुरू होणार होती. या कंपनीच्या ३ मजली इमारतीचे काम सुरु होते. या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या ६ जणांचे कुटुंब याच इमारतीत राहात होते. मात्र, शनिवारी रात्री टेस्टिंग घेत असताना भीषण स्फोट झाला. या स्फोटात एकाच कुंटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाला. तर २ लहान मुलींचा जीव वाचला. पण, या मुलींच्या आई-वडिलांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. शनिवारी (११ जानेवारी) एक लिफ्टमन आपल्या मालकासोबत हिशोब करण्यासाठी इथे आला होता. त्याचाही यात मृत्यू झाला. त्याचा मृतदेह आज सकाळी ८ वाजता सापडला. आतापर्यंत या स्फोटात ८ मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. तर एक मुलगी अद्यापही बेपत्ता आहे.

Tarapur Palghar Fire,Palghar Tarapur Fire,Palghar, Tarapur, Fire,Palghar Fire,Tarapur Fire,Maharashtra,Boisar Fire,Maharashtra Fire,Gujrat Fire,Vadodara Fire,Chemical Factory Fire,Chemical Factory,Chemical, Factory,Tarapur, Palghar, Fire,Tarapur Fire,Palghar Fire

स्फोट हा इतका भीषण होता की याचा आवाज आजूबाजूच्या परिसरात दूरपर्यंत ऐकू आला. सुरुवातीला या परिसरात भूकंप झाल्याचा भास झाला. मात्र, नंतर एका कंपनीत स्फोट झाल्याचं स्पष्ट झालं. या स्फोटानंतर परिसरातील वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. या स्फोटानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. स्फोटावर नियंत्रण मिळविण्यासाठी पालघर तारापूर औष्णिक केंद्र, डहाणू, पालघर येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. परिसरात वीजपुरवठा बंद केल्याने मृतदेह शोधण्यास आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अडथळे येत होते.

Palghar Chemical Factory Fire,Palghar, Chemical Factory Fire,Palghar Fire,Tarapur Palghar Fire,Palghar Tarapur Fire,Palghar, Tarapur, Fire,Palghar Fire,Tarapur Fire,Maharashtra,Boisar Fire,Maharashtra Fire,Gujrat Fire,Vadodara Fire,Chemical Factory Fire,Chemical Factory,Chemical, Factory,Tarapur, Palghar, Fire,Tarapur Fire,Palghar Fire

मृतकांची नावे…

माधुरी सिंग, निशु सिंग, गोलू यादव, राजमातीदेवी यादव, मोहन इंगळे अन्सारी इलियास यासह एका लिफ्टमनचा समावेश आहे. तर अजून मुलगी बेपत्ता आहे. सध्या मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे.

राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत…

तारापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकी ५ लाख रुपये घोषित केले. जखमींना संपूर्ण वैद्यकीय साहाय्य दिले जावे, असे निर्देश प्रशासनाला दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments