आसाममध्ये आज संचारबंदी झुगारुन जाळपोळ, दगडफेक

- Advertisement -

Defy Curfew In Guwahati As Assam Rages Over Citizenship Billगुवाहाटी : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन संपूर्ण आसाममध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. आसामच्या गुवाहाटी शहरात नागरीकांनी आज गुरुवारी सकाळी संचारबंदी झुगारुन हिंसक विरोध प्रदर्शन केले. आसामच्या चार भागांमध्ये लष्कर तैनात करण्यात आले आहे. तरीही परिस्थिती सध्या चिघळलेली आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन आसाम आणि ईशान्येकडच्या अन्य राज्यांमध्ये लोक रस्त्यावर आले आहेत. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन संपूर्ण आसाममध्ये तणावाची स्थिती असून लष्कराने गुवाहाटीमध्ये फ्लॅग मार्च केला. गुवाहाटी शहर आंदोलनाचे मुख्य केंद्र असून आसामच्या चार भागांमध्ये लष्कर तैनात करण्यात आले आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन ईशान्य भारतातील राज्यांमध्ये हिंसक विरोध प्रदर्शन सुरु आहे. ऑल आसाम स्टुडंट युनियन, क्रिष्क मुक्ती संग्राम समितीने लोकांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. संचारबंदी असताना रात्री रस्त्यावर लोकांचे विरोध प्रदर्शन सुरु होते. गुरुवारी सकाळी गुवाहाटीमध्ये लष्कराने फ्लॅगमार्च केला.

- Advertisement -

भाजपा आणि एजीपी नेत्यांच्या घरावरे हल्ले…

भाजपा आणि एजीपी नेत्यांच्या घरावरे हल्ले झाले आहेत. गाडयांची जाळपोळ करण्यात आली. अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून आम्ही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत. आतापर्यंत परिस्थिती नियंत्रणात आहे अशी माहिती आसामचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश अग्रवाल यांनी माध्यमांना दिली. दिब्रुगड, साद्या आणि तेजपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर हल्ले करण्यात आले आहेत.

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here