Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमनसे झेंडा बदलून मरगळ दूर करणार का?

मनसे झेंडा बदलून मरगळ दूर करणार का?

Raj Thackeray MNS Flag change,Raj, Thackeray, MNS, Flag,Maharashtra Navnirman sena,Sena,Maharashtra

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. सध्या त्यांच्या मनसेची वाताहात सुरु आहे. हे सर्व रोखण्यासाठी भविष्यातील डावपेचांसाठी पक्षाच्या बहुरंगी झेंड्याचा रंग बदलणार अशी चर्चा सुरु आहे. त्याऐवजी केशरी किंवा भगव्या रंगाचा झेंडा करण्याची शक्यता आहे. परंतु मनसे झेंडा बदलून पक्षातील मरगळ दूर करणार का अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे.

मनसेला सतत येणा-या अपयशामुळे मनसेने झेंडा बदलण्याची शक्कल लढवली आहे. त्याचप्रमाणे यांची वाटचाल हिंदुत्वाच्या दिशेने सुरु झाली आहे. अशीही चर्चा सुरु आहे. मनसेला एका मागून एक धक्के बसत असल्यामुळे मनसेने थेट पक्षाचा झेंडा बदलण्याची शक्कल लढवली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची राजकीय भूमिका स्थिर नसल्यामुळे तसेच ते कार्यकर्त्यांना,पदाधिका-यांना वेळ देत नाही. त्यामुळे मनसेची ताकद राज्यात वाढत नाही. असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांमध्येही नाराजी राहते. यामुळे मनसेला उतरती कळा लागलेली असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.

मनसेचे २००७ मध्ये मुंबई महानगरपालिकेत ७ नगरसेवक निवडून आले. इतरत्रही मनसेने चांगले यश मिळवले. २००९ साली मनसेने सर्वप्रथम लोकसभा निवडणुका लढवल्या. त्या निवडणुकीत मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशकात लाखालाखाच्या घरात मते घेतली. त्याच निवडणुकीत मुंबईत सेना – भाजप युतीचा एकही खासदार निवडून आला नाही. त्याचे कारण होतं फक्त “मनसे”. आक्रमक नेतृत्व, तरुणाईवर पडलेलं गारुड आणि बोल बोल म्हणता सेनेचा मराठीचा मुद्दा हायजॅक केलेली मनसे हा सेना भाजप युतीसाठी सर्वात मोठा धोका होता. मनसेने २००९ च्या विधानसभा निवडणुकीत १४३ जागा लढवल्या होत्या आणि पहिल्याच विधानसभा निवडणुकीत पक्षाचे १३ आमदार निवडून आले होते. सेनेचे २० हुन अधिक पडले ते वेगळेच. हा मनसेचा खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ होता. २०१४ मध्ये फक्त १ आमदार निवडून आला होता.

२०१२ साली मोदींच्या दिल्ली आगमनाचे भाजपने निश्चित केले. त्या निर्णयाचे स्वागत करणारे आणि मोदींची जाहीर पाठराखण करणारे राज हे गुजरात आणि भाजपबाहेरचे पहिले नेते होते. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत भल्याभल्यांचा पालापाचोळा झाला. छोट्या मोठ्या पक्षातील अस्वस्थ नेत्यांना मोदी आणि भाजपच्या रूपाने समर्थ पर्याय निर्माण झाला. मनसेही त्याला अपवाद नव्हती. मनसेचे अनेक आमदार, नगरसेवक भाजपात दाखल झाले.

त्या निवडणुकीत युती तुटल्यानंतर भाजप आपल्याला जवळ करील असे राज यांना वाटले असावे, पण मोदी कैफात बुडालेल्या भाजपला मनसे नकोशी वाटली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा केवळ एक आमदार निवडून आला आणि पक्षाकडे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे असे प्रभावहीन नेते तेवढे उरले. २०१९ मध्ये विधानसभेत मनसेचे एकच आमदार निवडून आले. मनसेला मोठा धक्का बसला. त्यामुळे मनसेला पुर्नेजिवीत करण्यासाठी मनसे भूमिका बदलण्याची शक्यता आहे.

२३ जानेवारीला भूमिका स्पष्ट होणार…

मनसेचा २३ जानेवारीला पक्षाचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसे भविष्यात भाजपसोबत घरोब करु शकते अशीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मनसेची पुढील वाटचाल कशी राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments