Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशदंगल भडकवणाऱ्यांना शोधून काढू : अमित शाह

दंगल भडकवणाऱ्यांना शोधून काढू : अमित शाह

NRC will be implement across the country Amit Shahनवी दिल्ली : ईशान्य दिल्लीत उसळलेल्या दंगलीमागे कटकारस्थान असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. ही दंगल भडकवणाऱ्यांना शोधून काढू. मग ते कोणत्याही जाती, धर्माचे किंवा राजकीय पक्षाचे असोत, असा विश्वास शहा यांनी दंगल पीडितांबद्दल सांत्वन व्यक्त करताना दिला. पण त्याचवेळी अमित शहांनी विरोधकांनाही उत्तर दिलं.

दिल्ली दंगलीवर लोकसभेत आज चर्चा झाली. या चर्चेला अमित शहा यांनी उत्तर दिलं. ईशान्य दिल्लीत दंगली उसळली. काही तासांत या दंगलीचं लोण पसरलं. एवढ्या कमी वेळात कुठल्याही कटाशिवाय दंगल उसळू शकत नाही. यामुळे ईशान्य दिल्लीतील दंगल प्रकरणी कटकारस्थान रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या दिशेने तपास सुरू असल्याचं अमित शहा यांनी सांगितलं.

जाळपोळ करणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त करणार…

ईशान्य दिल्लीतील दंगल पोलिसांनी ३६ तासांत नियंत्रणात आणली, असं सांगत अमित शहांनी दिल्ली पोलिसांची पाठराखण केली. दिल्ली पोलिसांनी एका विशिष्ट समाजाविरोधात कारवाई केल्याचा एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांचा आरोपही शहांनी फेटाळून लावला. दंगलीत मरण पावलेल्या हिंदू-मुस्लिमांवरून विरोधकांना शहांनी उत्तर दिलं. दंगलीत मरण पावलेले भारतीय होते, असं शहा म्हणाले. दंगलीत जाळपोळ करून मालमत्तांचं नुकसान करणाऱ्यांची मालमत्ता जप्त केली जाईल. दंगलीच्या दोषींना अशी केली जाईल जी सदैव स्मरणात राहील, असं अमित शहा म्हणाले.

ट्रम्प यांच्या कार्यक्रमात गेलो नाही…

दंगलीवेळी अमित शहा हे कुठे होते? शहा अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत फिरत होते? असे आरोप विरोधकांनी केले. पण मी कुठेही गेलो नाही. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती भवनमध्येही ट्रम्प यांच्यासाठी विशेष डिनर आयोजित केले होते. पण मी तिथेही गेलो नाही. दंगलीच्या काळात पूर्णवेळ दिल्ली पोलिसांसोबत होते. दंगल नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांसोबत काम करत होतो, असं अमित शहा म्हणाले.

दंगल प्रकरणी कारवाई करताना कुठल्याही निष्पापावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी आतापर्यंत ४९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १५३ शस्त्र जप्त केली गेली आहेत. तसंच शांतता प्रस्थापित करण्यासाठी २५ फेब्रुवारीपासून ६५० बैठका घेण्यात आल्या आहेत. दिल्ली दंगल प्रकरणी एकूण २, ६४७ जणांना ताब्यात घेण्यात आलं. त्यापैकी काहींना अटकही केली गेली. २७ फेब्रुवारीपासून ते आतापर्यंत ७०० एफआयआर दाखल झाल्या आहेत, अशी माहिती अमित शहा यांनी दिली.

सोशल मीडियावर २२ फेब्रुवारीला ६० अकाउंट सुरू करण्यात आले…

दिल्ली दंगलीवेळी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर चिथावण्यासाठी केला गेला. सोशल मीडियावर २२ फेब्रुवारीला ६० अकाउंट सुरू केले गेले. या अकाउंटवरून प्रक्षोभक पोस्ट केलेल्या गेल्या. यावर कारवाई करत पोलिसांनी ही अकाउंट्स २६ फेब्रुवारीला बंद केली. सोशल मीडिया अकाउंट्सवरून समाजात द्वेष पसरवणाऱ्यांचा तपास पोलीस करत आहे, असं अमित शहा यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments