Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यागतिमंद मुलीवर चार नराधामांचा सामूहिक बलात्कार

गतिमंद मुलीवर चार नराधामांचा सामूहिक बलात्कार

gang rapes on girl nashikनाशिक : देशभरात अत्याच्याराचे प्रमाण वाढत असताना नाशिकमध्ये संतप्त प्रकार उघडकीस आला. आदिवासी भागातील सुरगाणा येथे 19 वर्षीय गतिमंद मुलीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार खुटविहिर गावात उघडकीस आला. सुरगाणा पोलिसांनी चारही नराधमांना अटक केली आहे. दीपक काशीराम पवार, दीपक आनंद पवार, सुरेश शिवराम शेवरे आणि अशोक उणाजी गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत.

या विषयी अधिक माहिती अशी की, पीडित मुलीच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी मुलीस फसू लावून गावातील निर्जन स्थळी शेतावर नेले. येथे तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. रात्रभर संशयित तिच्यावर अत्याचार करत होते. सकाळी बहिणीने तिला रात्रभर कुठे होती याबाबत विचारले असता तिने हात इशाऱ्याने घडलेला प्रसंग सांगण्याचा प्रयत्न केला. बहिणीला संशय आल्यानंतर तिने बहिणीला पाहिले असता तिच्यावर पाशवी व अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे समजले. बहिणीला घेऊन तिने पोलिस ठाण्यात धाव घेतली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संशयितांचा शोध घेत त्यांना मोहपाडा, मालगोंदा, भाकुर्डी येथे अटक केली. दरम्यान, यापूर्वी आरोपींनी इतर कुणावर अत्यचार केले का याचा तपास पोलिस करत आहेत.

या प्रकारामुळे गावकरी संतप्त….

गतिमंद मुलीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी खुटविहिर गावात नागरिक संतप्त झाले आहेत. आरोपींना फाशी द्या अशी मागणी गावक-यांनी केली आहे. आरोपींना आमच्या हवाली करा अशी मागणीही गावक-यांनी पोलिसांकडे केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments