Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रशिवरायांना जगभरातून अभिवादन, सोशल मीडिया शिवमय

शिवरायांना जगभरातून अभिवादन, सोशल मीडिया शिवमय

Shivaji Maharaj Shiv Jayanti,Shivaji Maharaj, Shiv Jayanti,Shivaji Maharaj Jayanti, Shivaji Jayanti,Shivaji, Maharaj, Shiv, Jayantiमुंबई : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ३९० वी जयंती आज बुधवार ( १९ फेब्रुवारी) साजरी होत आहे. या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी, राष्ट्र्वादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सचिन तेंडुलकर, बीग बी अमिताभ बच्चन यांच्यासह जगभरातून शिवाजी महाराजांना अभिवादन केलं जात आहे. शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यामुळं सोशल मीडिया शिवमय झाला आहे.

व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून जगभरातून शिवाजी महाराजांना अभिवादन केलं जात आहे. शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यामुळं सोशल मीडिया शिवमय झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भारताचा विश्वविक्रमवीर फलंदाज सचिन तेंडुलकर, यांच्यासह असंख्य नेते, अभिनेते,लेखक, कवी, पत्रकार, समाजसेवकांनी ट्विटरच्या माध्यमातून महाराजांना मानवंदना दिली आहे.

महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (तारखेनुसार) आज संपूर्ण देशभरात साजरी होत आहे. त्या निमित्तानं ठिकठिकाणी मिरवणुका, बाइक रॅली व अन्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ शिवनेरी किल्ल्यावर; शिवजन्म सोहळ्यात झाले सहभागी

महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडून शिवाजी महाराजांना अभिवादन


शिवरायांसारख्या राष्ट्रपुरुषांकडून समस्त जनतेनं प्रेरणा घ्यावी. आपल्या मुलांना शिवरायांच्या जीवनाचे धडे द्यावेत – राज्यपाल कोश्यारी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून शिवरायांना अभिवादन, शिवाजी पार्क येथील अश्वारुढ शिवपुतळ्याला केला पुष्पहार अर्पण


महाराष्ट्र सदनातील शिवजयंती सोहळ्याला ११ देशांचे राजदूत उपस्थित राहणार

शिवजयंती सोहळ्यासाठी नाशिक व पुण्यावरून ढोलपथकं दिल्लीला रवाना

राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातही शिवजयंती सोहळ्याचं खास आयोजन

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments