Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशकोरोना व्हायरसने घेतला देशात पहिला बळी

कोरोना व्हायरसने घेतला देशात पहिला बळी

India's first coronavirus death confirmed in Karnataka

बंगळुरू : जगभरात थैमान मांडलेला कोरोना व्हायरस भारतातही झपाट्याने पसरत आहे. या व्हायरस मुळे आता एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील कलबुर्गी येथे राहणाऱ्या एका ७६ वर्षीय व्यक्तीचा यात मृत्यू झाला आहे. त्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. कोरोनामुळे भारतात झालेला हा पहिलाच मृत्यू आहे.

प्राथमिक माहितीनुसार , या व्यक्तीचा मृत्यू मंगळवारी (10 मार्च) रात्री झाला होता परंतु त्याच्या मृत्यूच कारण अस्पष्ट होत. नंतर काही नमुने तपासले असता त्याचा मृत्यू कोरोनाने झाल्याचे उघड झाले आहे. हा व्यक्ती जानेवारी महिन्यात सौदी अरेबियात गेला होता आणि 29 फेब्रुवारीला भारतात परतला होता. यातच त्याला कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

 जागतिक आरोग्य संघटना (WHO)ने कोरोना व्हायरसला ‘जागतिक साथीचा रोग’ म्हणून जाहीर केले आहे. आता पर्यंत जगभरातील 127 देशांमध्ये हा पसरला असून 1 लाख 34 हजार 806 लोकांना याची लागण झाली आहे तर 4 हजार 984 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments