Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशजामिया : ‘ये लो आझादी’ म्हणत गोपालचा आंदोलकांवर गोळीबार

जामिया : ‘ये लो आझादी’ म्हणत गोपालचा आंदोलकांवर गोळीबार

Rambhakt Gopal Jamia,Rambhakt Gopal, Jamia,Rambhakt, Gopal,Ram,bhakt नवी दिल्ली : जामिया मिलिया विद्यापीठाच्या परिसरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) ला विरोध करणाऱ्याआंदोलकांवर गोपाल नावाने तरुणाने आज बुधवारी (३० जानेवारी) बंदुकीतून गोळी झाडली. यात जामियातील एक विद्यार्थी शादाब जखमी झाला आहे.

विद्यार्थी शादाबच्या हातावर गोळी लागली असून त्याला होलीफॅमिली इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. गोळीमारणाऱ्याचे नाव गोपाल असून तो आंदोलकांना ‘ये लोआझादी’ असे धमकावत पिस्तुल दाखवत होता. पोलिसांनी गोपालला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी CAA विरोधात निदर्शनं केली. त्यांचा जामिया ते राजघाट मोर्चा काढण्याचा बेत होता. या मोर्चादरम्यानच जमाव हिंसक झाला. गोपालने हातात पिस्तुल धरत घोषणाबाजी केली.

या घटनेच्या फोटोत व व्हीडिओत गोपाल आंदोलकांच्यादिशेने पिस्तुल रोखून त्यांना धमकावत होता तर त्याच्यामागे पोलिस उभे असल्याचे दिसून येत आहे. गोळीबार करणाऱ्या युवकाच्या फेसबुक प्रोफाइलवरत्याचे नाव ‘रामभक्त गोपाल’ असून तो या घटनेचे थेटप्रक्षेपण फेसबुकवरून करण्याच्या प्रयत्नात होता. त्याच्याफेसबुकवरच्या काही पोस्टवरून तो हिंसा करण्याच्यातयारीत असल्याचेही दिसून येत होते.

दिल्ली पोलिसांची बघ्याची भूमिका…

विद्यार्थ्यांच्या आंदोलन सुरु असताना गोपाल नावाच्या तरुणाने गोळीबार केला. घोषणाबाजी केली. पिस्तुल घेऊन फिरत होता. त्यावेळी त्याने घोषणाबाजी केली. मात्र पोलीस हे बघ्याची भूमिका घेत होते. माध्यमांचे प्रतिनिधी, कॅमेरेमॅन त्या विद्यार्थ्याकडे जात असताना तो घोषणाबाजी करत होता. त्याचवेळी पोलीस हे बघ्याची भूमिका घेत असताना दिसून आले.

फेसबुक पोस्टमध्ये काय लिहीलयं…

फेसबुकवर गोपाल हा स्वत: ला रामभक्त दाखवत आहे. २८ जानेवारीला एक पोस्ट टाकली. ३१ जानेवारीपर्यंत याकडे दुर्लक्ष करु नका. असं सांगितलं होतं. आज एका पोस्टमध्य लिहीलयं होतं की, माझ्या अंतिम संस्कारसाठी भगवा कपड्यामध्ये घेऊन जा. ‘जय श्रीराम’ चे नारे लावावेत. गोपालने फेसबुक च्या मित्रांना सांगितले, माझ्या कुटुंबाचे लक्ष ठेवा. एका पोस्ट मध्ये लिहीलयं…. शाहीन बाग… खेल खत्म!

आरोपी गोपाल बारावीचा विद्यार्थी…

गोळीबार करणारा गोपाल हा ग्रेटर नोएडामध्ये राहणार असून तो १२ व्या वर्गात शिक्षण घेतो. घरातून तो शाळेत जात आहे असं त्यानं सांगितलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments