Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशज्योतिरादित्यांना भाजपात राज्यसभेची बक्षीसी

ज्योतिरादित्यांना भाजपात राज्यसभेची बक्षीसी

Jyotiraditya Scindia,Jyotiraditya, Scindiaनवी दिल्ली : काँग्रेसचे माजी मंत्री भाजपवासी झालेले ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी देऊन बक्षीसी दिली आहे. आज बुधवारी भाजपात प्रवेश केला आजचं ज्योतिरादित्यांना मध्यप्रदेशातून राज्यसभेची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

ज्योतिरादित्य शिंदेंना काँग्रेसने पक्षश्रेष्ठींनी मध्यप्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदाची संधी दिली नाही त्यामुळे शिंदे नाराज होते. गेल्या दीड वर्षापासून शिंदे आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यामध्ये संघर्ष सुरु होता त्यामुळे ज्योतिरादित्य नाराज होते. त्यांच्या समर्थकांनी मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपदी मागितले होते परंतु काँग्रेसने ते पद देण्यासही इनकार केला होता. अखेर नाराज ज्योतिरादित्यांनी बंडाचा निशान फडवला. १९ आमदारांना त्यांनी काँग्रेसमधून फोडले. विशेष म्हणजे १९ काँग्रेस आमदार फुटल्यामुळे मध्यप्रदेशमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments