Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रनंदुरबारZP RESULT : मंत्री के.सी. पाडवींना धक्का, पत्नीचा पराभव

ZP RESULT : मंत्री के.सी. पाडवींना धक्का, पत्नीचा पराभव

K C Padvi,K,C, Padvi,Hemlata Padvi,Hemlataनंदुरबार : राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांचा तोरणमाळ गटातून पराभव झाला आहे. शिवसेनेचे गणेश पराडके यांनी  एक हजार मतांनी त्यांचा पराभव केला आहे. यामुळे ना. पाडवींसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

नंदूरबार जिल्हा परिषदेचे ५६ गट आणि पंचायत समितीच्या ११२ गणांसाठी ६ तालुक्यात मंगळवारी मतदान झाले होते. आज बुधवारी मतमोजणी सुरू असून संपूर्ण जिल्ह्यात धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल समोर येत आहेत. धडगाव तालुक्यातील तोरणमाळ गटात प्रथमच निवडणूत लढणाऱ्या आदिवासी विकालमंत्री के.सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. शिवसेनेचे तालुकाध्यक्ष गणेश पराडके यांनी विजयश्री खेचून आणली आहे.

धडगाव तालुक्यात काँग्रेसचे चार तर शिवसेनेचे तीन उमेदवार विडयी झाले. दरम्यान, नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने प्रथमच मुसंडी मारत काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का दिला आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या एकूण ५६ पैकी २१ जागांचे निकाल समोर आले आहेत. त्यात काँग्रेस आघाडीवर आहे.

नंदुरबारमध्ये काँग्रेस आघाडीचा वर्चस्व

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ५६ गटांसाठी २२५ उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समितीच्या ११२ जागांसाठी ३५९ उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. २०१३ मध्ये काँग्रेसचा वरचष्मा राहिला, मात्र २००८ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत नंदुरबार जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. त्यामुळे भाजपला नंदुरबार जिल्हा परिषद खेचून आणण्यासाठी दमछाक करावी लागणार आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीची जबाबदारी के सी पाडवी यांच्याकडे होती. त्यांची पत्नीच निवडणूक रिंगणात असल्याने ही लढत प्रतिष्ठेची झाली होती. के सी पाडवी हे नंदुरबारमधील अक्कलकुवा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारमध्ये के सी पाडवी यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली आहे. गेल्याच आठवड्यात के सी पाडवी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेसने पहिल्यांदाच के. सी. पाडवी यांना मंत्रिपदाची संधी दिली आहे. मात्र, हा के.सी.पाडवींना मोठा धक्का बसला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments