केजरीवालांचा शपथविधी ‘या’ तारखेला होणार!

- Advertisement -

Arvind Kejriwal Delhi Results,Arvind Kejriwal, Delhi Results,Arvind, Kejriwal, Delhi, Resultsनवी दिल्ली : दिल्लीत सलग तिसऱ्यांदा आम आदमी पक्ष सत्ता स्थापन करणार आहे. अरविंद केजरीवाल यांचा शपथविधीसोहळा रविवार (१६ फेब्रुवारी) रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर होणार आहे. यासाठी आम आदमी पक्षाने जय्यत तयारी सुरु केली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत दिल्लीकरांनी आम आदमी पक्षाला एकहाती सत्ता दिली. २०१५ प्रमाणेच यंदाही दिल्लीच्या रामलीला मैदानावर केजरीवाल सरकारचा शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे.

दिल्लीत सलग तिसऱ्यांदा आम आदमी पक्ष सत्ता स्थापन करणार आहे. केजरीवाल यांनी आज सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत शपथविधीची तारीख आणि संभाव्य मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

केजरीवाल आपल्या शपथविधीला सर्व राजकीय नेत्यांना निमंत्रण देणार आहेत. यासाठी आम आदमी पक्षाने जय्यत तयारी सुरु केली आहे. दिल्लीच्या एकूण ७० पैकी ६२ जागांवर आम आदमी पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. तर भाजपला ८ जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

- Advertisement -