Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमहाविकास आघाडीची केंद्र सरकार CAA, NRC, NPR विरोधात विशाल रॅली

महाविकास आघाडीची केंद्र सरकार CAA, NRC, NPR विरोधात विशाल रॅली

मुंबईत २४ जानेवारीला रॅलीचे आयोजन

Pawar Thorat Thackeray CAA NRC NPR,Pawar, Thorat, Thackeray, CAA, NRC, NPR,Uddhav Thackeray,Sharad Pawar,Balasaheb Thorat,Balasaheb,Sharad,Uddhav,CAA Protest,NRC Protest,NPR Protest,Mumbai Protest,Protestमुंबई : केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात, CAA, NRC, NPR च्या विरोधात महाराष्ट्र विकास आघाडीने दंड थोपटले. महाविकास आघाडीसह घटक पक्षातील सर्व डाव्या, पुरोगामी पक्ष आणि संघटनांनी २४ जानेवारीला दुपारी दादरच्या हुतात्मा बाबू गेनू कामगार स्टेडियमवर विशाल रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीचे नेतृत्व सर्व ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे करणार आहेत.

या रॅलीमध्ये सर्व पक्षीय राष्ट्रीय नेत्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, लोक भारती, सीपीआय, सीपीएम, जनता दल सेक्युलर, बीआरएसपी, राष्ट्र सेवा दल, भटके विमुक्त समाज, कामगार संघटना आणि विद्यार्थी संघटना यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीचे निमंत्रक आमदार कपिल पाटील आणि आमदार किरण पावसकर यांनी ही माहिती माध्यमांना दिली.

देशातील ३० टक्के समाजाला सामोरं जावं लागणार

या नव्या कायद्याने आदिवासी, भटके विमुक्त, लिंगायत आणि मुस्लिम यांच्यासह धर्म नसलेलेही बाधित होणार आहेत. देशातील ३० टक्क्यांहून अधिक समाजाला नोटबंदी पेक्षा अधिक मोठ्या जाचाला सामोरं जावं लागणार आहे. हा प्रश्न कोणत्या जाती समुहांचा नसून भारतीय नागरिकत्वाचा आणि संविधानाच्या रक्षणाचा मुद्दा आहे. त्यामुळे सर्व भारतीयांनी एकजुटीने केंद्र सरकारच्या विरोधात लढाईला सज्ज व्हावे असे आवाहन आजच्या बैठकीत करण्यात आले. कोणत्याही पक्षाचा झेंडा न वापरता देशाचा तिरंगा हातात घेऊन ‘हम भारत के लोग’ या नावानेच हे आंदोलन सुरू ठेवण्यास राजकीय पक्षांनी संमती दिली. राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांच्या पुढाकाराने अलीकडेच देशभरातील विचारवंत व अॅवक्टिव्हीस्ट एकत्र आले होते. त्यावेळी ‘हम भारत के लोग’ या नावाने हे आंदोलन पुढे नेण्याचा निर्णय झाला होता.

या नेत्यांची होती उपस्थिती…

आज झालेल्या बैठकीत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, लोक भारतीचे आमदार कपिल पाटील, राष्ट्रवादीचे आमदार किरण पावसकर, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, समाजवादी पार्टीचे मिराज सिद्दीकी, सीपीआयचे प्रकाश रेड्डी, राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त व अंजुमने इस्लामचे चेअरमन डॉ. जहीर काझी, बीआरएसपीचे सुरेश माने, सीपीएमचे डॉ. अशोक ढवळे, जनता दल सेक्युलरचे प्रभाकर नारकर, मलविंदसिंग खुराणा, सीटिझन्स फोरम अगेन्स्ट NRC/NPRचे फारूक शेख, भटके विमुक्त समाज नेते डॉ. कैलास गौड, छात्र भारतीचे सचिन बनसोडे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments