Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमुंबई मनपा पोटनिवडणूक : शिवसेनेचे विठ्ठल लोकरे विजयी; भाजपचा पराभव

मुंबई मनपा पोटनिवडणूक : शिवसेनेचे विठ्ठल लोकरे विजयी; भाजपचा पराभव

Vitthal Lokare,Shiv Sena,Shiv,Sena,Vitthal,Lokare

मुंबई : मुंबई महापालिकेच्या मानखुर्द प्रभात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे विठ्ठल लोकरेंचा विजय झाला. भाजपच्या दिनेश ( बबलू ) पांचाळ यांचा १३८५ मतांनी पराभव केला. लोकरेंनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. विशेष म्हणजे शिवसेनेच्या लोकरेंविरोधात भाजप, काँग्रेस, समाजवादी आणि एमआयएम अशी लढत होती. मात्र, मानखुर्दमध्ये शिवसेनेने बाजी मारली.

राज्यात महाविकास आघाडी असतांना सुध्दा काँग्रेसने शिवसेना विरोधात उमेदवार दिला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला होता. मात्र, शिवसेना- भाजप युती तुटल्यानंतर शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची सुरु होती. गुरुवारी पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते तर आज शुक्रवारी (१० जानेवारी) रोजी निकाल जाहीर झालं.

प्रभाग क्रमांक १४१ मधील पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून विठ्ठल लोकरे, भाजपकडून दिनेश (बबलू) पांचाळ तर काँग्रेसकडून अल्ताफ काझी रिंगणात आहेत. एमआयएमचे खान सद्दाम हुसेन इमामुद्दिन आणि समाजवादी पक्षाचे जमीर खान या उमेदवारांमध्ये लढत झाली. एकूण १८ उमेदवार या निवडणुकीसाठी मैदानात उतरले होते.

कोण आहेत विठ्ठल लोकरे…

विठ्ठल लोकरे हे आधी काँग्रेसमध्ये होते. विधानसभा निवडणुकीत ते अबू आझमींविरोधात उभे होते. पराभव झाल्यानंतर त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आणि ते शिसेनेत गेले. मानखुर्द प्रभाग क्रमांक १४१ च्या पोटनिवडणुकीत आता ते पुन्हा नशीब आजमावत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments