Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमोदींना दणका; 'त्या' संपत्तीचा लिलाव होणारच

मोदींना दणका; ‘त्या’ संपत्तीचा लिलाव होणारच

nirav-modiमुंबई : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदी चा मुलगा रोहिन याला मुंबई उच्च न्यायालयानं धक्का दिला आहे. ‘सक्तवसुली संचालनालयानं (ईडी)ने जप्त केलेल्या रोहिन ट्रस्टच्या पेटिंग्जच्या लिलावास स्थगिती देण्यास न्यायालयानं नकार दिला आहे.

मुख्य न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी व न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठापुढं या याचिकेवर सुनावणी झाली. उच्च न्यायालयानं रोहिनची स्थगितीची विनंती फेटाळून लावत लिलावाची प्रक्रिया सुरू ठेवण्याची मुभा ईडीला दिली. मात्र, लिलावाद्वारे पेंटिंग्जच्या विक्रीतून येणारी रक्कम वापरू नये आणि बँक खात्यात जमा ठेवावी, असे निर्देशही न्यायालयानं दिले.

१५ दुर्मिळ पेंटिंग्जचा लिलाव उद्या, ५ मार्च रोजी होणार

नीरव मोदी सध्या फरार आहे. त्यामुळं मोदीची मालमत्ता जप्त करून तिच्या लिलावातून पैसे वसुलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रक्रियेचा भाग म्हणून नीरव मोदी, त्याची पत्नी व मुलगा रोहिन यांच्या रोहिन ट्रस्टच्या मालकीच्या १५ दुर्मिळ पेंटिंग्जचा लिलाव गुरुवार (५ मार्च) रोजी होणार आहे. या लिलावाला रोहिन मोदीनं याचिकेद्वारे आव्हान दिलं होतं. जप्त केलेल्या पेंटिंग्ज या ट्रस्टच्या मालकीच्या आहेत आणि त्याचा मीही लाभार्थी आहे. त्यामुळं या लिलावाला स्थगिती देण्याचा हंगामी आदेश काढण्याची विनंती केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments