Placeholder canvas
Wednesday, May 8, 2024
Homeमुख्य बातम्यामुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी पाच महिने बंद

मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी पाच महिने बंद

mumbai airport main runway
मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुख्य धावपट्टी डागडुजी अन्य कामानिमित्त बंद असणार काही विशेष दिवस वगळता ४ नोव्हेंबर ते २८ मार्च या काळात दिवसातील आठ तास विमान वाहतुकीसाठी बंद ठेवली जाणार आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ४ नोव्हेंबरपासून सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत मुख्य धावपट्टी बंद असेल. या काळात सर्व विमान वाहतूक दुय्यम धावपट्टीवरून होईल. रविवार आणि काही विशेष दिवसांसाठी मात्र मुख्य धावपट्टी विमान वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिली जाईल. या विशेष दिवसांमध्ये नाताळ २५ डिसेंबर, नववर्ष १ जानेवारी, १९ आणि २१ फेब्रुवारी, १० आणि २५ मार्चचा समावेश असणार आहे.

धावपट्टीची पुनर्बाधणी, नव्याने तयार करण्यासारखी अन्य कामे १ नोव्हेंबरपासून सुरू होणार होती. परंतु, पावसामुळे ती पुढे ढकलावी लागली. तसेच या कामामुळे मुख्य धावपट्टी दिवसातून किमान आठ तासांसाठी बंद ठेवावी लागेल. याबाबत विमान कंपन्यांना वर्षभरापूर्वीच कल्पना देण्यात आली होती. हे काम कधी सुरू होईल, कधी संपेल याचा कालावधीही कळविण्यात आला आहे. त्यानुसार विमान फेऱ्या आणि सेवांची आखणी करण्याचे कंपन्यांना सूचित करण्यात आले.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुख्य धावपट्टीवर ताशी ४६ विमाने उतरतात, उड्डाण घेतात. दिवसा सरासरी हजार विमानांची ये-जा या धावपट्टीद्वारे होते. येथील दुय्यम धावपट्टीची ताशी ३६ विमान वाहतुकीची क्षमता आहे. मुख्य धावपट्टी बंद असताना या धावपट्टीची क्षमता वाढवण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments