Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन अभिनेत्रींना बेड्या

मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन अभिनेत्रींना बेड्या

Sex Racket goregaon 5 star hotel,Sex, Racket, goregaon, 5 star, hotel,Sex Racket, goregaon, 5 star hotelमुंबई : मुंबईतील गोरेगावमधल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये चाललेल्या सेक्स रॅकेट पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन अभिनेत्रींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गोरेगावमधील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी छापा मारत कारवाई केली.

डीसीपी डॉ. डी स्वामी यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. नववर्षात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश होण्याची मुंबईतील ही दुसरी घटना आहे. दिंडोशी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक धर्मेंद्र कांबळे यांनी सांगितले की, 32 वर्षीय अमृता धानोआ आणि २६  वर्षीय रिचा सिंग यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३७० (३), ३४ आणि अनैतिक प्रतिबंधक कलम ४,५ अन्वये अटक करण्यात आली आहे.

पाच जानेवारीला दहीसरच्या गिरी निवास रावळपाडा भागात चालणाऱ्या सेक्स रॅकेटमधून तीन मुलींची सुटका झाली होती, तर एका दलाला अटक करण्यात आली होती. दोन मुली पश्चिम बंगालच्या होत्या, तर एक तरुणी ही बांगलादेशाची असल्याचं समोर आलं होतं. तिच्याकडे बांगलादेशाचा पासपोर्ट आणि व्हिसाही सापडला होता. गोरेगावमधील कारवाईमध्ये पुढील तपास पोलीस करत आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments