Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याबाबासाहेबांचे परळमधील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक घोषित

बाबासाहेबांचे परळमधील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक घोषित

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी परळ येथील बीआयटी चाळीतील निवासस्थानात २२ वर्षे वास्तव्य केले त्या परळ येथील बीआयटी चाळीतील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शुक्रवारी केली. आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ही मागणी लावून धरली होती.

 

मुख्यमंत्र्यांनी आज चैत्यभूमीला भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी वरळीतील बीआयटी चाळीला भेट दिली. ़यावेळी त्यांच्यासोबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होते. बीआयटी चाळ क्र. १ मधील खोली क्रमांक ५० व ५१ या दोन खोल्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबीयांचे १९१२ ते १९३४ असे प्रदीर्घ काळ वास्तव्य होते. येथूनच ते विश्वविख्यात विद्वान व महामानव म्हणून प्रसिद्धीस पावले.

 

त्यांच्या जीवनात या वास्तूचे खूप महत्त्व होते. बीआयटी चाळ क्रमांक १ मधील या दोन खोल्यांमध्ये सध्या वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचे योग्य पुनर्वसन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील हा एतिहासिक वास्तूरूपी अमूल्य ठेवा जतन करावा आणि त्या ठिकाणी यथायोग्य स्मारकाची निर्मिती करावी, अशी मागणी सातत्याने होत होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments