सोनिया गांधींशी राज्यातील सत्तास्थापनेबाबत चर्चा नाही : शरद पवार

- Advertisement -

No discussion on Maharashtra government formation with sonia gandhi says Sharad pawar
दिल्ली : महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीची माहिती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना दिली. सत्तास्थापनेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत दिली.

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये जवळपास 45 मिनिटं चर्चा झाली. शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही? सरकार स्थापन करायचं की नाही? या कोणत्याही प्रश्नांवर चर्चाच झाली नाही असंही शरद पवार यांनी स्पष्ट केले. तसंच आघाडीतल्या मित्रपक्षांनाही नाराज करुन चालणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, समाजवादी पक्ष हे पक्ष आमच्या आघाडीसोबत निवडणूक लढले. त्यांनाही विश्वासात घ्यावं लागेलं असेही शरद पवार यांनी सांगितले.

सोनिया गांधी यांची भेट घेतली तेव्हा तिथे ए. के. अँटनीही हजर होते असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचे नेते काँग्रेस महाआघाडीचे नेते एकत्र बैठका घेत आहेत. असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर शरद पवार म्हणाले सर्व आमदार जर एकत्र चर्चा करण्यासाठी येत असतील तर त्यात गैर काय असं उत्तरही दिलं.

- Advertisement -
- Advertisement -