Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रअहमदनगरकितीही मोठं आव्हान असलं तरी झुकायचं नाही हे शरद पवारांनी शिकवलं –...

कितीही मोठं आव्हान असलं तरी झुकायचं नाही हे शरद पवारांनी शिकवलं – रोहित पवार

Rohit Pawarअहमदनगर : कधीही हार मानायची नाही. कितीही मोठं आव्हान समोर असलं तरी झुकायचं नाही. सर्वसामान्य माणसांना डोळ्यासमोर ठेवून काम करा. असा सल्ला आम्हाला शरद पवारांनी दिला असं आमदार रोहित पवार यांनी सांगितलं. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या संगमनेर येथे मेधा २०२० युवा संस्कृतीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुलाखतकार अवधूत गुप्ते यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आमदार रोहित पवार बोलत होते.

रोहित पवार म्हणाले की, कर्जत जामखेड मधील जनता माझ्या पाठिशी असल्यामुळे माझा विजय झाला. तसेच तुम्ही ज्या वेळी निवडून आलात तेव्हा तुमच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं असल्याचा भावनिक प्रश्न विचारण्यात आला होता. यावर मी जिंकलो म्हणून माझ्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आले नव्हते. तर मला मोठ्या प्रेमाने,मताधिक्याने निवडून दिले. म्हणून माझ्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं असं रोहित पवार म्हणाले.

भाजपने कर्जत जामखेडमध्ये पवार घराण्यातील तिसरी पिढी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. परंतु या निवडणुकीत प्रा. राम शिंदे यांचा रोहित पवारांनी पराभव केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments