Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई...आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नको;प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

…आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नको;प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Uddhav Indu Mill Prakash,Uddhav, Indu Mill, Prakash,Uddhav Thackeray,Indu, Mill, Prakash Ambedkar,Thackeray,Ambedkar,Dr Babasaheb Ambedkar Memorial,Ambedkar Memorial,Babasaheb Ambedkar Memorial,Ambedkar Memorial,Memorial,Dadar Memorial

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दोन पुतळे आहेत. तिस-या पुतळ्याची आता गरज नाही. जो पुतळ्याचा निधी आहे तो वाडिया रुग्णालयाला देण्यात यावा. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

इंदू मिल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारले जाणार आहे. त्याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३०० फूट उंचीचा पुतळा उभारला जाणार आहे. असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर केलं. त्या पार्श्वभूमीवर आज रविवार (१९ जानेवारी ) प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची भेट घेतली. वाडिया रूग्णालयाला आज निधीची गरज आहे. त्यामुळे तो निधी रूग्णालयाला द्यावा. अशी मागणी भेटीदरम्यान आंबेडकरांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. स्मारकाची जागा इन्स्टियूटला देण्यात यावी. न्यायलयानेही पुतळ्यांवर खर्च करण्यासाठी सरकारकडे पैसा आहे परंतु रुग्णालयाला देण्यासाठी पैसा नाही. त्यामुळे मी ही याचं मताचा आहे की, पुतळ्याचा निधी रुग्णालयला द्यावा. असं आंबेडकरांनी नमूद केलं.

२४ तारखेचा बंद शांततेनं करणार असल्याचा शब्द दिला…

CAA  आणि NRC विरोधात २४ जानेवारीला मुंबईसह महाराष्ट्र बंदची वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज रविवारी प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंशी भेट घेतली. या भेटीदरम्यान उध्दव ठाकरेंनी बंद शांततेत पाळा असं सांगितलं. असेही प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. आम्ही शांतेत बंद पाळू असा शब्द मी मुख्यमंत्र्यांना दिला असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments