Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईआता खासगी कंपन्या बंद; कर्मचारी करणार वर्क फ्रॉम होम!

आता खासगी कंपन्या बंद; कर्मचारी करणार वर्क फ्रॉम होम!

Work from home due to coronavirus, coronavirus, work from home, rajesh tope, private companies mumbai jobमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बॅंक, औषधं, मनोरंजन क्षेत्रातील २० ते २५ कंपन्यांसोबत आरोग्यमंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये कंपन्यांनी बंद करण्यासाठी होकार दर्शविला आहे. त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. कर्मचारी वर्क फ्रॉम होम करतील. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

देशामध्ये कोरोनामुळे ११८ जणांना लागण झाली असून महाराष्ट्रात सर्वात जास्त ३९ नागरीक कोरोनाबाधीत झाले आहेत. आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात कोरोना हा सेकंड स्टेज मध्ये आहेत. तो थर्ड स्टेजमध्ये जाऊ नये यासाठी काळजी घेण्यात येत आहे. सर्व शाळा, महाविद्यालये, स्विमिंग पूल, मॉल बंद आहेत. त्यानंतर धार्मिकस्थळेही बंद करण्यात आले आहेत. त्यानंतर आता खासगी क्षेत्रातील कार्यालयं बंद करण्यासाठी कंपन्यांनी मान्यता दिली आहे. पुणे येथे काही कंपन्यांनी आधीच वर्क फ्रॉम होमचा निर्णय घेतला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments