आता राज्यातील शाळांत दहावीपर्यंत मराठी विषय बंधनकारक

- Advertisement -

Subhash Desai Marathi Language,Subhash Desai, Marathi Language,Subhash, Desai, Marathi, Language, Marathi Subject Compulsoryमुंबई : राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय बंधनकारक करण्यात येणार आहे. येत्या विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक मंजूर करण्यात येणार आहे. उद्योग आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली.

मराठी भाषा विभागाकडून समिती नेमण्यात आली

अभ्यासक्रमात मराठी विषय अनिवार्य करणारा अधिनियम लागू करण्यासाठी मराठी भाषा विभागाकडून समिती नेमण्यात आली होती. त्यानंतर, विधी व न्याय विभागानं अन्य राज्यांचे अधिनियम व केंद्रीय शिक्षण हक्क अधिनियम २००९च्या तरतुदी लक्षात घेऊन आपले अभिप्राय दिले आहेत’, अशी माहिती मागील महिन्यात देसाई यांनी दिली होती. अन्य राज्यांतील कायद्यांच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या मराठी भाषा अधिनियम प्रस्तावावर विस्तृत चर्चाही करण्यात आली होती.

- Advertisement -

२४ फेब्रुवारी रोजी अधिवेशनात पहिल्याच दिवशी मंजूर करण्यात येणार…

आता लवकरच राज्यांतील सर्व शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय बंधनकारक करण्यात येणार आहे. यासंबंधीचे विधेयक येत्या विधीमंडळ अधिवेशनात मंजूर करण्यात येणार आहे. २४ फेब्रुवारी रोजी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हे विधेयक सभागृहात मांडण्यात येईल. त्यानंतर २७ तारखेला मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून हे विधेयक मंजूर करण्यात येईल, अशी माहितीही देसाई यांनी यावेळी दिली.

- Advertisement -