Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेश...आता राम गोपाल वर्मांचा हैदराबादच्या डॉक्टर तरुणीवर चित्रपट

…आता राम गोपाल वर्मांचा हैदराबादच्या डॉक्टर तरुणीवर चित्रपट

Ram Gopal Verma Hyderabadहैद्राबाद : बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट तयार करतात. आता राम गोपाल वर्मा हैदराबादमधील पशुवैद्यक तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावर चित्रपट तयार करणार आहेत.

राम गोपाल वर्मा यांनी चित्रपट तयार करण्यासाठी यांनी हैदराबाद विमानतळ पोलीस स्टेशनला भेट दिली. यावेळी त्यांनी शमशाबादचे एसपी एन्काऊंटर म्हणून प्रसिद्धी मिळवलेले वी. सी. सज्जनार यांची भेट घेतली. भेट घेऊन वर्मा यांनी बलात्कार प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. जेणेकरुन चित्रपटातील पटकथेत याचा फायदा होईल.

काय आहे हैदराबाद बलात्कार प्रकरण काय?

हैदराबाद येथील टोल नाक्याजवळ २८ नोव्हेंबर २०१९ रोजी  एका २६ वर्षीय डॉक्टरचा जळालेला मृतदेह सापडला. चौकीशीनंतर महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती अशी माहिती समोर आली. पोलिसांनी त्याच दिवशी चारही आरोपींना अटक केली होती. त्यानंतर चारही आरोपींचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला.

दरम्यान, प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटाच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. राम गोपाल यांचा शेवटचा चित्रपट २०१७ मद्ये प्रदर्शित झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments