Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईसांगाल तिथं येईन, मला गोळी मारा; ओवेसींनी दिलं अनुराग ठाकूर यांना खुलं...

सांगाल तिथं येईन, मला गोळी मारा; ओवेसींनी दिलं अनुराग ठाकूर यांना खुलं चॅलेंज

Asaduddin Owaisi Anurag Thakur,Asaduddin Owaisi, Anurag Thakur,Asaduddin, Owaisi, Anurag, Thakur,BJP,AIMIM

मुंबई : देशातील कुठलीही जागा सांगा आणि त्याठिकाणी येऊन मला गोळी मारा असं आव्हान मजलिस- ए- इत्तेहादुल मुस्लीम (एमआयएम) चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना दिलं आहे.

ओवेसी म्हणाले, मी तुला अनुराग ठाकूरला आव्हान देईन, मला देशातील कोणतीही जागा सांगा, जिथे तुम्ही मला गोळी घालाल आणि मी येण्यास तयार आहे. तुमच्या वक्तव्यामुळे माझ्या मनात भीती निर्माण होणार नाही. कारण आमच्या माता भगिनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या आहेत आणि त्यांनी देश वाचविण्याचा निर्णय घेतला आहे. ओवेसी पुढे म्हणाले की, देश वाचविण्याची आणि गांधीजी तत्वे जिवंत ठेवण्यासाठी हा लढा आहे.

दिल्ली विधानसभा हस्तगत करण्यासाठी आप, भाजपा व काँग्रेस या तीन पक्षात मुख्य जोरदार लढत होणार आहे. तिन्ही पक्षांनी दिल्लीची सत्ता मिळवण्यासाठी प्रचारात झोकून दिल्याचं चित्र सध्या आहे. भाजपाचे उमेदवार मनीष चौधरी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी वादग्रस्त घोषणा दिली होती.

रिठला विधानसभा क्षेत्रात झालेल्या या सभेत भाषण करताना अनुराग ठाकूर यांनी देश के गद्दारों को.. घोषणा केली. त्यानंतर सभेला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी ‘गोली मारो… को’ अशी घोषणाबाजी केली होती. रिठाला विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार मनीष चौधरी यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही उपस्थिती होती.

या प्रकरणी भाजप आणि अनुराग ठाकूरांवर जोरदार टीका झाली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने गांभीर्याने दखल घेतली आहे. यामुळे भविष्यात ठाकूरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments