Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रडॉ. दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेलं पिस्तूल सात वर्षानंतर सापडलं!

डॉ. दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेलं पिस्तूल सात वर्षानंतर सापडलं!

नॉर्वेमधील पाणबुडे आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सीबीआयला यश

Dr Narendra Dabholkar Gun,Dr Narendra Dabholkar,Narendra Dabholkar,Narendra, Dabholkarमुंबई : सात वर्षापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली होती. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेलं पिस्तूल अरबी समुद्राच्या तळातून हे पिस्तूल सापडलं. या प्रकरणी सीबीआयला मोठं यश मिळालं आहे.

नॉर्वेमधील पाणबुडे आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे पिस्तूल सीबीआयने अरबी समुद्राच्या तळातून हे पिस्तूल शोधून काढलं आहे. पुण्यात २०१३ रोजी नरेंद्र दाभोलकर यांची दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी गोळी घालून हत्या केली होती. हे पिस्तूल दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरले होते का ? याचा तपास सध्या सीबीआय करत असून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी मदत करणाऱ्या दुबई स्थित एन्विटेक मरीन कन्सल्टंटने नॉर्वेमधून यंत्रसामग्री मागवली होती. पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी तज्ञांकडून लोहचुंबकाचा वापर करण्यात आला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत खारेगाव येथील सर्व परिसराची छाननी करण्यात आली. या ऑपरेशनसाठी सीबीआयकडून पूर्ण तयारी करण्यात आली होती. राज्य सरकारकडून परवानगी घेण्यापासून ते पर्यावरण खात्याकडून मंजुरीपासून सगळी तयारी त्यांनी केली होती. नॉर्वेमधून यंत्रसामग्री आणण्यासाठी ९५ लाखांचा सीमाशुल्क त्यांना माफ करण्यात आला.

सीबीआयने २०१९ रोजी पुणे कोर्टात ठाण्यामधील खारेगाव खाडीत हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचा शोध घ्यायचा असल्याचं सांगितलं होतं. शवविच्छेदन अहवालात असलेल्या माहितीच्या आधारे बॅलिस्टिक तज्ञ पिस्तुलाची पाहणी करणार आहेत. पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी आखण्यात आलेल्या या मोहिमेसाठी एकूण ७.५ कोटींचा खर्च आला. या केसचा निकाल लागावा यासाठी सीबीआय सर्वोपतरी प्रयत्न करत आहे. दाभोलकरांच्या हत्येत वापरण्यात आलं होतं की नव्हतं हे स्पष्ट होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments