प्राध्यापकाने विद्यार्थीनीकडे केली ‘सेक्स’ची मागणी!

- Advertisement -
Women Rape Sex Racket,Women, Rape, Sex Racket, Sex, Racket,Gang Rape
Representational Image

अहमदनगर : नांदेडमध्ये सहावीच्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्काराची घटना नुकतीच घडली. तसेच मुंबईच्या घाटकोपरमध्ये गुण वाढवून देतो असे सांगत प्राध्यापकाने विद्यार्थीनीकडे चुंबनाची मागणी केली होती. या घटना ताज्या असताना अहमदनगरमध्ये प्राध्यपकाने विद्यार्थीनीला परीक्षेत गुण वाढवून देतो असे सांगत सेक्सची मागणी केली. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

इंटरनल परीक्षेत गुण वाढवून देतो असे असे सांगून बारावीतील विद्यार्थीनीकडे प्राध्यापकाने शरिरसुखाची मागणी केल्याचा प्रकार श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील महाविद्यालयात घडला आहे. या प्रकरणी प्राध्यापक बाबूराव पांडुरंग कर्णे (रा. बोरावकेनगर, श्रीरामपूर) याच्याविरुध्द फिर्याद नोंदविण्यात आली आहे. विद्यार्थिनीच्या आईच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मंगळवारी वर्गात असताना प्राध्यापकाने विद्यार्थिनीशी असा प्रकार केला होता. घडलेला प्रकार मुलीने आला सांगितला होता. मुलगी व नातेवाइकांनी महाविद्यालयात येऊन प्राचार्यांकडे तक्रार केली होती. परंतु प्राध्यापकाने मुलीची माफी मागितली होती. असा प्रकार पुन्हा करणार नाही, असे लेखी ही प्राचार्यांना दिले होते. परंतु हा प्रकार इतर विद्यार्थीनींच्या पालकांना समजला होता. गावात ही घटना समजल्यानंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. ग्रामस्थ महाविद्यालयात जमले होते. बुधवारी सकाळी ग्रामस्थ हे श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनला गेले होते. प्राध्यापकाविरुध्द गुन्हा नोंदविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार पिडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून प्राध्यापकाविरुध्द बुधवारी दुपारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणामुळे प्राध्यापक हा गावातून फरार झाला आहे.

या प्रकरणी बुधवारी प्राध्यापकाविरुध्द विनयभंग करणे, अॅट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हा प्राध्यापक फरार झाला आहे. गाव बंद ठेवून ग्रामस्थ पोलिस स्टेशनला गेले होते. त्यानंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

- Advertisement -

काय आहे विद्यार्थीनीचा आरोप…

इंटरनल परीक्षेत गुण वाढवून देतो असे सांगून बारावीतील विद्यार्थिनीकडे प्राध्यापकाने शरिरसुखाची मागणी केल्याचा आरोप विद्यार्थीनीने केला आहे. हा प्रकार श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील महाविद्यालयात घडला आहे. या प्रकरणी प्राध्यापक बाबूराव पांडुरंग कर्णे (रा. बोरावकेनगर, श्रीरामपूर) याच्याविरुध्द फिर्याद नोंदविण्यात आली आहे.

- Advertisement -